Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी सरसावले दीपक बोरकर

जिल्हा नियोजन विकास समितीच्या सभेमध्ये उपस्थित केला मुद्दा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरात नगर परिषदेच्या वतीने चार मराठी प्राथमिक शाळा एक उर्दू प्राथमिक शाळा व एक उच्च माध्यमिक शाळा चालवण्यात येते यामध्ये जुनी नगर परिषद ची प्राथमिक शाळा क्रमांक 1ची इमारत जुनी झाल्याने तांत्रिक सल्ल्यानुसार सदर इमारत जमीन दोस्त  करण्याचा निर्णय घेऊन त्याच जागेवर नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी ठराव घेऊन सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करत नगरपरिषदेने बांधकामासाठी निधी मिळवण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव सादर केला.

मात्र पुरेसा निधी प्राप्त न झाल्यामुळे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद अंतर्गत दहा शाळा खोल्या बांधकामाचा प्रस्ताव सादर करण्यात आला त्यासाठी शासनाने एक कोटी 32 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला मात्र सदर निधीमधून या शाळेचे बांधकाम पूर्णत्वास जात नसल्याने या कामाचे अंदाजपत्रकात वाढीव तरतूद करण्यात यावी यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीचे सदस्य तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर यांनी दिनांक 27 जुलै रोजी पार पडलेल्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या सभेत सदर शाळा बांधकामासाठी डी पी डी सी तून अधिकचा निधी मंजूर करावा.

अशी मागणी केली असून सद्यस्थितीत या शाळेतील सर्वच विद्यार्थी हे नगर परिषदेच्या लीलाव भवनामध्ये टीन पत्राचे पार्टिशन केलेल्या खोलीत शिक्षण घेत आहे या विद्यार्थ्यांना सर्व सोई युक्त इमारत होण्यासाठी डी पी डी सी तून आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी दीपक बोरकर यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीवरून डी पी डी सी चे प्रमुख ना. दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत संबंधित यंत्रणा प्रमुखांना या शाळा खोल्या बांधकामाचा प्रस्ताव ची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, वाढीव निधी प्राप्त झाल्यानंतरच मुलांचे खेळाचे प्रांगण तयार करून ईतर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये