Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

आरोही विद्यालयाच्या संगीत परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान – संगीतमय रिमझिम गिरे सावन कार्यक्रमाने आणली सोहळ्याला रंगत

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

स्वर प्रीती कला अकादमी द्वारा आरोही सुगम संगीत विद्यालयाच्या वतीने रिमझिम गिरे सावन या पावसाच्या व निसर्ग गीताच्या गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच जून सत्र 2024 मध्ये झालेल्या परीक्षेचे प्रमाणपत्र भारतीय संगीत कलापीठ द्वारा मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. आरोही सुगम संगीत विद्यालयाच्या केंद्रप्रमुख व स्वरप्रीतीच्या संचालिका अलका सदावर्ते यांनी संगीत शाळेच्या संगीत शाळेच्या विद्यार्थ्यांचे एक शास्त्रीय सरगम गीत व गुरु प्रार्थना सादर करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदर्शन दाचेवार, स्वर प्रितीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते, जेसीआय राजुरा रॉयल्सच्या अध्यक्षा स्वरूपा झंवर, आरोही सुगम संगीत विद्यालयाच्या केंद्रप्रमुख अलका सदावर्ते, जेसीआयच्या झोन वाईस प्रेसिडेंट सुषमा शुक्ला पालक प्रतिनिधी म्हणून तसेच चंद्रपूर जिल्हा पटवारी संघाचे उपाध्यक्ष सुनील रामटेके मंचावर विराजमान होते.

याप्रसंगी प्रास्ताविकातून अलका सदावर्ते यांनी भारतीय संगीत कडून शासन मान्यता प्राप्त असलेले केंद्र मिळाल्यामुळे राजुऱ्यातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना संगीत गुणवत्ता व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी लाभदायक ठरणारे केंद्र आहे अशी माहिती दिली. पाचव्या वर्षापासून तर 55 वर्षापर्यंतचे विद्यार्थी आरोही संगीत विद्यालयात संगीताचे शिक्षण घेत घेताना स्वर तालाची उपासना करीत आहेत असे भावोत्कट उद्गार स्वरप्रितीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात स्वरप्रीती अविरतपणे कार्य करणारी संस्था आहे असे मत सुषमा शुक्ला यांनी व्यक्त केले. स्वरा प्रीती नवनवीन कलावंत घडून मंच प्राप्त करून देते, सर्वांना संधी उपलब्ध करून देते असे असे मत स्वरूप झंवर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सुदर्शन दाचेवार ह्यांचा स्वरप्रीतीच्या वतीने शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. स्वर प्रीती अनेक वर्षापासून कार्य करीत आहे सदावर्ते दांपत्य सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे कार्य करीत आहेत असे मत अध्यक्षीय मनोगतातून दाचेवार ह्यांनी व्यक्त केले.

बहारदार कार्यक्रमाचे संचालन ज्योती कोरडे व आभार प्रदर्शन वीणा देशकर यांनी मांडले या प्रसंगी करुणा गावंडे, स्वतंत्रकुमार शुक्ला, जयश्री मंगरूळकर, अनमोल बोरकर, सुनील रामटेके, हर्षाली मोहूर्ले, बालाकृष्णा गुम्मीदी, निर्मला बांगडे यांनी पावसाची व निसर्गाची गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता रचना देवगडे, सरिता हिंगाणे, अश्विनी वाटेकर, प्रिया खंडाळे, गीता खोके, आरुषी डवरे, संगीता जीवतोडे, पायल ताजणे, स्वरा मारोटकर, साहस इंगळे, नयन रामटेके व संगीत शाळेतील सर्व पालक व विद्यार्थी यांनी सहकार्य केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये