Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरकुलाचे पैसे उपलब्ध करून द्या – नितीन गोहने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली : सावली तालुक्यामध्ये मोदी आवास योजना,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना,रमाई आवास योजना इत्यादी योजने अंतर्गत ग्रामीण भागात घरकुलांचे कामे सुरु आहेत.मात्र शासनाने निधी उपलब्ध करून नं दिल्यामुळे ग्रामीण भागातील घरकुलांचे रखडलेली आहे.शासन निधी केव्हा देणार या विवंचनेत जनता असून शासनाच्या कारभाराला कंटालेली दिसुन येत आहे.

मागील वर्षांपासून सामान्य गरीब माणसांना घरकुले मंजूर झालीत आपल्या जवळील पैसे खर्च करून लोकांनी घरे बांधली,जवळील सर्व पैसा खर्च केला.दुकानदारांचे देणे बाकी आहे,त्यामुळे दुकानदार सुद्धा साहित्य टाकण्यास टाळाटाळ करीत आहे.सुंदर घरांचे स्वप्न मृगजळ ठरत आहे.या पावसात लोकांना राहावे लागते,त्यामुळे जनतेत सरकार विषयी प्रचंड नाराजी आहे.

ग्रामीण भागातील लोकांना घरकुल बांधकामासाठी दीड लाख रुपये मिळतात आज रेती, लोहा, सिमेंट, मजुरी यांचे भाव आकाशाला भिडलेले आहेत.एवढ्या थोड्या पैशात घरकुलाचे बांधकाम करून शक्य नाही,त्यातही अनेक वर्षांपासून घरकुलाच्या रक्कमेत वाढ करण्यात आलेली नाही. तटपुंज्या पैशात घरकुल बांधायचे कसे असा प्रश्न घरकुल धारकांना पडलेला आहे.

वाढती महागाई व तटपुंजी शासनाची मदत याच्या संयुक्त मेळ जुडवितांना सामान्य नागरिकांना मोठे कष्ट करावे लागत आहे.सावली तालुक्यातील बहुतांश घरकुलाचे काम अर्धवट आहे.शासनाने पैसे न दिल्यामुळे गरीब जनतेचि मोठी नुकसान होत आहे. शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली यावर करोडो रुपये खर्च करण्यास मान्यता दिली.मात्र घरकुल धारक लाभार्थीवर अन्याय का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन घरकुल धारकांचे पैसे त्वरित देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.शासन सदर पत्राकडे लवकरात लवकर लक्ष्य देईल का ? याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष्य लागलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये