ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पांदन रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे हाल

शेतकऱ्यांना पादन रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. चंद्रशेखर प्यारमवार

पांदण रस्ते म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्याचा हक्काचा मार्ग परंतु हाच मार्ग शेतकऱ्यांच्या नाकात दम आनत आहे शेतात पोहोचण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना शेतातून इतर पिके घेता येत नाही व त्यांना पारंपरिक पिकावरच अवलंबून राहावे लागत आहे सावली तालुक्यातील पांदन रस्त्याची वाट फार लागली असून शेतकऱ्यांची वाट चीखळमय झालेली आहे पादन रस्ता म्हणजे शेतकऱ्यांना आपापल्या शिवारातून शेतात शेतमाल बी बियाणे किंवा शेती अवजारांचे ने आण करण्यासाठी निर्माण केलेला वहिवाटेचा मार्ग परंतु हाच मार्ग सुरळीत असला तर शेतीची कामे सुरळीत पार पाडता येतात मात्र हेच पादन रस्ते खराब झाले असून शेतकऱ्यांची वाट लागत आहे शेतकऱ्यांना चिखलयुक्त रस्ते तूड वावे लागतात कधी कधी गुडघाभर पाण्यातून त्यांना मार्ग काढावा लागतो त्यामुळे शेतमजूर सुद्धा शेतात जाऊन कामे करण्यास तयार होत नाहीत तेव्हा शेती कशी करावी असा प्रश्न शेतकरी पुढे पडलेला आहे अनेकदा शेतकऱ्यांना पायी
जाताना सापाने चावा घेतलेला आहे यात अनेक शेतमजुरांचा मृत्यूही झालेला आहे तसेच नव्यानेच नगरपंचायत झालेल्या सावली परिसरात पांदण रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व शेती अवजारे नेण्यासाठी फार कठीण समस्या बनलेली आहे याबाबत या परिसरातील आमदार आणि खासदार यांनी लक्ष देऊन सावली नगरपंचायत हद्दीत येत असलेल्या शेतकऱ्यांना पादन रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये