Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना आणि जिवती तालुक्यात आयुष्मान कॉर्ड विशेष मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना १ जुलै २०२४ पासून विस्तारीकरण करून नवीन स्वरूपात राबविण्यात येत आहे. या नवीन स्वरूपातील योजना ही राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आलेली असून पाहिले प्रमाणे केशरी,पिवळे,अंत्योदय आणि अन्नपूर्णा लाभार्थी कुटुंबा व्यतिरिक्त आत्ता शुभ्र राशन कार्ड धारक कुटुंबे आणि ज्यांच्याकडे राशन कार्ड नसेल परंतु महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीस आणि कुटुंबास सुद्धा लाभ देण्यात येत आहे. केंद्र शासन पुरस्कृत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रमाणे आत्ता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे सुद्धा आयुष्मान कॉर्ड तयार करण्यात येत आहेत.

     कोरपना तालुक्यात ग्रामीण भागात एकूण ७४७७० पात्र लाभार्थी असून त्यापैकी २३५५६ लाभार्थी यांचेच आयुष्मान कॉर्ड काढण्यात आलेले आहे. जिवती तालुक्यात ५६२२८ लाभार्थी असून त्यापैकी १४१०६ व्यक्तीचे आयुष्मान कॉर्ड काढण्यात आलेले आहे. लाभार्थी व्यक्तीने स्वतः चे आयुष्मान कॉर्ड काढण्याची पद्धत. मोबाईल च वापर करून गुगल प्ले स्टोअर मधून Ayushman App वापर करून Beneficiary लॉगिन मधून स्वतः पात्र नागरिक आपले आयुष्मान कॉर्ड स्वतः काढू शकते. यात आयुष्मान ॲप च वापर करून वरीलप्रमाणे लॉगिन केल्यावर प्रथमतः Scheme मध्ये PMJAY select करणे Sub scheme मध्ये PMJAY-MJPJAY (अंत्योदय आणि पिवळे राशन कार्ड धारक कुटुंबे) किंवा MJPJAY -White ration card (केशरी आणि शुभ्र राशन कार्ड कुटुंबे)

 यात पात्र लाभार्थी यांचा आधार क्रमांक किंवा family ID म्हणजेच ऑनलाईन राशन कार्ड क्रमांक प्रविष्ठ करून आपले नाव लाभार्थी यादीत शोधू शकतो.

लाभर्थी व्यक्तीचे नाव शोधल्यावर आधार ओटीपी, आधार फेस authentication इत्यादी चया साहाय्याने आपले आधार authentication पूर्ण करावे.त्यानंतर लाभार्थी व्यक्तीचे फोटो आणि इतर माहिती भरून त्यास submit करावे.

 योजनेत समाविष्ट जिल्यातील अंगीकृत रुग्णालये –

१. मानवतकर रुग्णालय

२. क्रिस्त रुग्णालय

३. मुसळे रुग्णालय

४. वासादे रुग्णालय

५. गडेगोने रुग्णालय

 टोल फ्री क्र.१५५३८८/१८००२३३२२००/१४५५५/१८००१११५६५

त्याअनुषंगाने कोरपना /जीवती तालुक्यातील मा. तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील संवर्ग विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी (आरोग्य), गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत),पुरवठा निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांची सभा संपन्न झाली.

कोरपना आणि जिवती तालुक्यातील सर्व नागरिकांना असे आव्हान करण्यात येते की, आपल्या मोबाईल मध्ये आयुष्मान अँप डाऊनलोड करून आपले नाव पात्रता यादीत शोधावे,आपले आधार कार्डच्या माध्यमातून ई केवायसी करून आयुष्मान कॉर्ड स्वतः काढावे आणि रू. ५ लक्ष आरोग्य विमा कवच १३५६ उपचाराकरिता प्राप्त करून घ्यावे.

डॉ. स्वप्नील टेंभे

तालुका आरोग्य अधिकारी कोरपना व जिवती तथा सदस्य सचिव प्रधानमन्त्री जन आरोग्य

अभियान कोरपना व जिवती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये