Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिमस बँक शेतकरी, व्यवसायी, महीला यांच्या सदैव पाठीशी – संतोषसिंह रावत

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्वसामान्याची व गोरगरीबांची बैंक माणून ओळखली जाते. विपरीत परिस्थितीतही बँकेच्या ९३ शाखांद्वारे शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देत असून शेतकरी, लहान व्यवसायी, महीला यांचे जिवनमान उंचावण्याकरीता बैंक सदैव पाठीशी भक्कमपणे उभी राहीली असून बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी बल्लारपुर येथील शेतकरी, महीला मेळाव्यात केले.

बँकेतर्फे बल्लारपुर कोठारी शाखेअंतर्गत शेतकरी व महीला बचत गट मेळावा दि.२०.०८.२०२४ रोजी संत तुकाराम महाराज हॉल बल्लारपुर येथे आयोजित करण्यांत आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत हे होते. प्रमुख उपस्थितीत बँकेचे संचालक सर्वश्री संदिप गड्‌डमवार, डॉ. अनिल बाबई, राजेश रपाताटे, डॉ. ललित मोटपरे, संचालिका डॉ. श्रीमती प्रभाताई वासाडे, सौ. नंदाताई अल्लुरवार, सामाजिक कार्यकर्ता अॅड. मेधाताई भाले कृ.उ.बा.समिती चंद्रपूरचे माजी सभापती श्री. रामभाउजी टोंगे, सामाजिक कार्यकर्ता श्री. गोविंदानी उपरे, अफसाना मॅडम, सुनिताताई दिलीप माकोडे, सामाजिक कार्यकर्ता तथा माजी न. प.सदस्य श्री. देवेद्रजी आर्य, बल्लारपुर तालुका काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष श्री. करीमभाई, न.प. बल्लारपुरचे माजी नगराध्यक्ष श्री. दिलीपरावजी माकोडे, माजी नगरसेवक श्री. इस्माईल भाई ठाकवाला, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर उपस्थित होते.

यावेळी बल्लारपुर व कोठारी शाखेअंतर्गत १००% कर्जवसुली करणा-या कोठारी वि.का., बामणी सेवा, दहेली सेवा, कळमना सेवा, या संस्थांचे मा. अध्यक्ष यांचा शॉल व श्रीफळ देवून सत्कार करण्यांत आला. तसेच १० बचत गटांना रु.२०.६० लाख रकमेचे कर्जाचे चेक वितरण करण्यांत आले.

बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी आपले अध्यक्षीय भाषणांत बँकेच्या विविध योजना व प्रगतीची माहीती दिली. आपल्या सर्वांच्या सहकायनि व संगालक मंडळाचे सहकायनि शेतकरी, लहान व्यवसायी, महीला बचत गट यांना वेळोवेळी कर्जसहाय उपलब्ध होण्याकरीता कर्जधोरणात कमीत कमी कागदपत्राने कर्जपुरवठा करून सामान्याचे जिवनमान उंचावण्याचा तसेच बँकेला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करीत आहो. आज आपली बैंक महाराष्ट्र राज्यात ५ व्या व विदर्भात २ या कमांकावर आहे. शेतकरी बांधवांना पिक कर्जवाटप व इतर शेतीपयोगी कर्जवाटपात बँक नेहमीच अग्रेसर राहीली आहे.

जिल्हयातील इतर बँकांच्या तुलनेत दरवर्षी पिक कर्जवाटपात बैंक प्रथम क्रमांकावर आहे. यावर्षी ७४९६३ शेतकीह बांधव सभासदांना ७९५.८५ कोटीचे पिक कर्जवाटप केले आहे.

महीलांचे जिवनमान उंचावण्याकरीता बैंक नेहमीच प्रयत्नशील आहे. दरवर्षी महीला बचत गटांना वर्षभर मोठया प्रमाणात कर्जवाटप करण्यांत येते. नविन मटांना २ महीण्यांत पुरेसे भांडवल असल्यास ५.०० लाख पर्यंत विनातारण कर्नर्म देण्यांत येते. एप्रिल २०२४ पासून ४४२५ बचत गटांना १०१.२५ कोटी कर्जवाटप करण्यांत आले आहे. नाबार्डचे व्याज सवलत योजनेअंतर्गत नियमित वसुली केलेल्या बचत गटांना ३ ते ४.५ टक्के व्याज सवलत देण्यांत येत आहे. त्यामुळे बचत गटांना फक्त ५.५ ते ७ टक्के व्याजदर पडतो. बँकेने लहान व्यावसायीकांच्या गरजा लक्षात घेता विनातारण ५००००/- पर्यंत २ वर्ष मुदतीचे कर्ज देण्यांत येत आहे. बँकेच्या व्यावसायीक खातेदारांना QR Code ची सुविधा उपलब्ध करून देण्यांत आली असून बँकेच्या व्यावसायीक ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुध्दा केले. तसेच बँकेच्या ठेवी व कर्जवाटपामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून एनपीए कमी करण्यांत आलेला आहे. दरवर्षी बँकेच्या नफयात वाढ होत आहे. त्यामुळेय मागील ३ वर्षांपासुन बँकेच्या भागधारकांना लाभांश देण्यांत येत आहे. बँकेचे संचालक मंडळ नेहमीच शेतकरी, लहान व्यवसायी, महीला यांचे जिवनमान उंचावण्याकरीता नेहमीच प्रयत्नशिल असून विविध योजना राबवित आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व बँकेला प्रगतीपथावर नेण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले.

याप्रसंगी बल्लारपुर, विसापुर, कोठारी शाखेअंतर्गत सहकारी संस्थांचे मा. अध्यक्ष व संचालक मंडळ, तसेच बचत गटांच्या महीलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये