Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरदराव पवार महाविद्यालयात विद्यार्थ्यांकरता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा संपन्न

महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्ष या विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सत्र 2024- 25 पासून शासन व विद्यापीठाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या पदवी स्तरावरील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा व प्रथम वर्षाचे विद्यार्थी यांचा स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यातआला. या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संजय गोरे, डॉ.हेमचंद्र दूधगवळी,डॉ. सुनील बिडवाईक,डॉ.राजेश गायधनी, डॉ.शरद बेलोरकर, डॉ.माया मसराम, डॉ. सत्येंद्र सिंह प्रा. मंगेश करंबे, प्रा. उज्वला कायरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

      यावेळी गोंडवाना विद्यापीठाने प्रथम वर्षाकरिता लागू केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा संदर्भात विषयाबाबत तसेच अभ्यासक्रम स्किल कार्यक्रम याबाबत सखोल मार्गदर्शन या कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांनी सविस्तरपणे केले.यावेळी गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.संजय गोरे, डॉ. हेमचंद्र दूध गवळी, डॉ. सुनील बिडवाईक डॉ. राजेश गायधनी, डॉ. शरद बेलोरकर, डॉ. माया मसराम डॉ. सत्येंद्र सिंह,प्रा. मंगेश करंबे यांनी आपल्या विषयांतर्गत विविध घटकाबाबत अभ्यासक्रम व गुणदान पद्धती बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे संचालन डॉ. शरद बेलोरकर यांनी केले तर आभार डॉ. राजेश गायधनी मानले. यावेळी प्रवेशित बीए च्या प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांचे निरसन करण्यात आले त्यांनी घेतलेल्या विषयाबद्दल सखोल मार्गदर्शन प्राध्यापकाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये