कृऊबासच्या चंदनखेडा उपबाजारात शेतमाल खरेदीचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील चंदनखेडा येथील समितीच्या उपबाजार आवारात दिनांक 21 पासून कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावतीचे सभापती भास्कर ताजने यांच्या हस्ते शेतमाल खरेदी करण्याचा शुभारंभ करण्यात आला. खरेदीच्या पहिल्याच दिवशी 43 क्विंटल शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला सभापती भास्कर ताजणे, संचालक गजानन उताणे, परमेश्वर ताजणे, श्यामदेव कापटे, भानुदास गायकवाड, शरद जांभुळकर, मनोहर आगलावे, कानोबा तिखट, राजू आसुटकर, शांताबाई रासेकर, सचिव नागेश पुनवटकर, नितेश ट्रेडिंग कंपनीचे संचालक नितेश तेला, लटारी रासेकर, बंडू नन्नावरे आदी उपस्थित होते.
बाजारात प्रथम शेतमाल विक्रीसाठी आणलेल्या हरिश्चंद्र रोडे व रवींद्र मेश्राम या शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. परिसरातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल चंदनखेडा उपबाजारात विक्रीसाठी आणावा असे आवाहन यावेळी सभापती भास्कर ताजने, उपसभापती आश्लेषा भोयर व सचिव नागेश पुनवटकर यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी विठ्ठल टोंगे, विलास पालकर, राजपाल भागवत, हनुमान मगरे, मापारी ईश्वर पोईनकर व अनिकेत सरोदे यांनी सहकार्य केले.