गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार करुन मासविक्री करणारे आरोपी ताब्यात

गुन्ह्यात वापरण्यात आलेली २ मोटार सायकल, इतर साहित्य व रोख रक्कम जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

दिनांक ०७ मे २०२४ ला अवैधरित्या रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार करुन मास विक्री करीता वाहतुक करीत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांना प्राप्त झाली. माहितीचे आधारे बल्लारपूर शहरातील सास्ती पुलीया परिसरात सापडा रचुन आरोपी श्रीकृष्ण गुलाब पवार, रा. हिरापुर, सदाशिव भास्कर देवगडे, रा. हिरापुर, वसंता यादव तोडेकर, रा. बल्लारपूर व तोमरय्या राजेय्या धोबल्ला, रा. बल्लारपूर यांना रानडुक्कर वन्यप्राण्याचे मास १० कि.ग्रा. सह ताब्यात घेतले.
वरील आरोपींची अधिक चौकशी केली असता ते रानडुक्कर वन्यप्राण्याचे मास विक्री करीत आणल्याची त्यांनी कबुली दिली. त्यांनतर मास विकत घेणारे आरोपी सुनील सदाशिव तुमराम, रा.महात्मा गांधी वार्ड बल्लारपूर, सावण सोजन बरसे, रा. गोकुलनगर वार्ड बल्लारपूर व जाणी पोचम गाजुल्ला, सुभाष नगर वार्ड बल्लारपूर यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी आरोपी वसंता यादव तोडेकर, रा. बल्लारपूर यांचे कडुन वन्यप्राण्याचे मास विकत घेत असल्याबाबत सांगितले असता सर्व आरोपी १ ते ७ विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम २, ९, ३९, ४४, ५१ व ५२ अनव्ये प्राथमिक वनगुन्हा क्रमांक ०८९६२/२२४०४५ दिनांक ७/५/२०२४ अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला असुन वन गुन्ह्यात वापरण्यात आलेले २ मोटार सायकल, इतर साहित्य व रोख रक्कम १६,८१०.०० जप्त करुन जप्तीनामा नोंदविण्यात आला. या कार्यवाही मुळे वन्यप्राण्याची शिकार करुन मास विक्री करणाऱ्या टोळीचा मोठा रॅकेट उघडकीस आला.
सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, स्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक  आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत.
सदर कार्यवाही दरम्यान क्षेत्र सहाय्यक, ए.एस. पठाण, के.एन. घुगलोत, बी.टी.पुरी, वनरक्षक सुधीर बोकडे, तानाजी कामले, परमेश्वर आनकाडे, सुनिल नन्नावरे, धमेन्द्र मेश्राम, एस.आर.देशमुख, ए.बी. चौधरी,एस.एस. नैताम यांनी सहकार्य केले
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये