ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

न.प.गाधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत १३ चंद्रपूर लोकसभा मतदार संघात मतदारांमध्ये मतदानाकरीता उत्साह निर्माण व्हावा व त्यांचा संपुर्ण सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी Systematic voters education and electoral Participation या ‘SVEEP’ कार्यक्रमा अंतर्गत “तुमचे मत द्या” स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यावर आधारित रील्स व्हिडिओ,मिम्स व पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यात देखील प्रशासनाकडून आयोजित करण्यात आल्या होत्या.सदर स्पर्धेत नगर परिषद गांधी विद्यालयाच्या इ.५वी व ६वी च्या ९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्कृष्ठ मतदार जनजागृती रील तयार केली. विद्यार्थ्यांमधील लोकशाही शिक्षण व नागरिकशास्त्रातील मूल्यांचा वाढ व विकास होऊन प्रत्यक्ष अनुभवातून जीवनाभिमूख लोकशाही शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने शाळेच्या वतीने स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात आला होता.दि.६/५/२०२४ ला मा.जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट मतदार जनजागृती रीलची दखल घेत नियोजन भवन चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात सदर सहभागी वर्गशिक्षिका दिप्ती राजेश मुसनवार व सहभागी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले व त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कक्षात विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रोत्साहित केले.

यामुळे विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये उत्साह व आनंदी वातावरण निर्माण झाले.यात इ.६वी तील प्रियंका हरिदास नांगरे, गुंजन प्रशांत गायकवाड व इ.५वी तील तमन्ना संतोष गिरी,संप्रीत शंकर पुतडवार, हर्षिता विजय सातपुते,आकांक्षा संजय बोरकर,मानसी नरेश खंडागळे,अलीशा अमर वर्मा,सुबैन इरफान शेख या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री.कडूकर सर व सर्व शिक्षकांनी मुलांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये