ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत ११.६५ कोटींचा निधी मंजूर

पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित

चांदा ब्लास्ट

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती Thakkar Bappa Tribal Settlement सुधार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांसाठी 11 कोटी 65 लाख 25 हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Guardian Minister Sudhir Mungantiwar यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे. चंद्रपूर, पोंभुर्णा, मुल आणि बल्लारपूर तालुक्यासाठी हा निधी मंजूर Funding approved झाला आहे.

ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभुत सुविधा पुरविण्यासाठी सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत एकूण 126 विकास कामांसाठी 11 कोटी 65 लक्ष 25 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात मुल तालुक्यातील 32 कामांसाठी 3 कोटी 10 लक्ष रुपये, चंद्रपूर तालुक्यातील 36 कामांसाठी 3 कोटी 45 लक्ष, पोंभुर्णा तालुक्यातील 35 कामांसाठी 2 कोटी 75 लक्ष 25 हजार रुपये आणि बल्लारपूर तालुक्यातील 23 कामांसाठी 2 कोटी 35 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

सदर निधी हा सोलर ट्युबवेल व हातपंप बसविणे, नाली बांधकाम, विद्युत पोल उभारणे, रस्ता बांधकाम, पेवर ब्लॉक्स लावणे, सिमेंट काँक्रिट बंदिस्त नाली बांधकाम, सामाजिक सभागृह बांधकाम, आदिवासी वस्ती चौकाचे सौंदर्यीकरण करणे, हायमास्ट सोलर लाईट लावणे, गोटूल बांधकाम, संरक्षण भिंत, वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण आदी कामांसाठी वापरण्यात येणार आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत विविध विकास कामांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणल्याबद्दल आदिवासी बांधवांनी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार Guardian Minister Shri. Mungantiwar यांचे आभार मानले आहे.

ज्या कामांसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे, त्याच कामांवर सदर निधी खर्च करणे बंधनकारक आहे. योजनाबाह्य कामे, आदिवासी लोकसंख्या नसलेल्या वस्तीतील कामे व जी कामे जागेचा अभाव किंवा इतर काही कारणांमुळे सुरू करणे शक्य नसतील, अशा कामांची शहानिशा करून प्रकल्प अधिकारी, चंद्रपूर यांनी त्या कामांची यादी एक महिन्याच्या आत शासनास सादर करावी, असे शासन आदेशात नमुद आहे.

Fund of 11.65 crores approved under Thakkar Bappa Adivasi Vasti Improvement Scheme

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये