ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे एससी,एसटी मधील आरक्षण उपवर्गीकरण आणि नॉन क्रिमिलियर संदर्भातील निर्णय हा संसदीय अध्यादेश द्वारे रद्द करण्यात यावा तसेच एससी,एसटी आरक्षणाचा समावेश नवव्या अनुसूची मध्ये करण्यात यावा या आणि इतर मागण्या साठी विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती याला देऊळगाव राजा येथे उत्स्फर्तपणे प्रतिसाद मिळाला, सकाळपासून दुपारपर्यंत आप आपली विविध प्रतिष्ठाने बंद ठेवून शहरवासीयांनी त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला,यामध्ये ग्रामीण भागामध्ये याची जास्त माहिती नसल्यामुळे सकाळी विविध कामासाठी शहराकडे विविध कामासाठी येणाऱ्या शेतकरी तसेच सामान्य कास्तकारांचे काही प्रमाणात कामाचे नियोजन कोलमडले

 उर्वरित शाळा,महाविद्यालय, वैद्यकीय सेवा, अत्यावश्यक सेवा ह्या मात्र नेहमीप्रमाणे नियमित सुरू होत्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये