ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राकेश चिंतला यांची घुग्घूस सचिवपदी, तर रोहन आगदारी यांची अध्यक्षपदी नियुक्ती

शिवसेना युवा सेनेत नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

चांदा ब्लास्ट

घुग्घूस, चंद्रपूर | 15 जून 2026 रोजी चंद्रपूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना युवा सेनेत प्रवेश करून संघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प केला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते राकेश चिंतला यांची युवा सेना घुग्घूस सचिव म्हणून, तर रोहन आगदारी यांची युवा सेना घुग्घूस अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित नेते व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी विदर्भ सचिव शुभम नवले, युवा सेना कार्यकारिणी सदस्य सुनील शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख युवराज धानोरकर, युवा सेना जिल्हाप्रमुख शैलेश केळझळकर, अविनाश उके, शिवसेना विधानसभा अध्यक्ष कैलास तेलतुमडे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख तसेच युवा सेना शहराध्यक्ष चंद्रपूर पवन यादव यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नव-नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत संघटनेची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आणि युवकांना संघटनेशी जोडून संघटना अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले. युवकांच्या सक्रिय सहभागामुळे संघटनेला नवी ऊर्जा आणि नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे आणि नव्या नियुक्त्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यात युवा सेनेचा जनाधार व संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल, तसेच युवकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यास मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये