Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आठ महिन्याच्या चिमुकलीसाठी डाॅ. मनीष मुंधडा ठरले देवदूत

शर्थीचे प्रयत्न : गळ्यात अडकलेली काजळाची डबी काढली

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : शहरातील बाबुपेठ परिसरातील आठ महिन्याच्या चिमुकलीने खेळताना अचानक काजळाची डबी गिळली. तिला त्रास होवू लागल्यानंतर रडायला लागल्याने आई मंजुषा मेश्राम यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनंतर लगेच चंद्रपुरातील कान, नाक, घसा तज्ज्ञ डाॅ. मनीष मुंधडा यांच्याकडे आणले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता शर्थीचे प्रयत्न करून गळ्यातील डबी काढून चिमुकलीला नवे जीवन दिले. त्यामुळे डाॅ. मनीष मुंधडा तिच्यासाठी देवदूत ठरल्याची भावना मेश्राम कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

शहरातील बाबुपेठ परिसरातील मंजुषा मेश्राम आपल्या आठ महिन्याच्या चिमुकलीसोबत शुक्रवारी सकाळी खेळत होत्या. याचदरम्यान चिमुकलीच्या हाती लागलेली काजळाची डबी तोंडात टाकल्याने गळ्यात फसली. काही वेळातच तिला त्रास झाल्याने चिमुकली रडायला लागली. आईने बघितल्यानंतर काजळाची डबी गिळल्याचे लक्षात आले. त्यानंतर मंजुषा मेश्राम यांनी डबी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या अयशस्वी झाल्याने व चिमुकली कासावीस होत असल्याने कान, नाक, घसा तज्ज्ञ डाॅ. मनीष मुंधडा यांच्याकडे आणले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गळ्यातील डबी काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांनी काही वेळातच गळ्यातील डबी काढून चिमुकलीला नवे आयुष्य दिल्याने मेश्राम कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, डाॅ. मनीष मुंधडा आमच्या मुलीसाठी देवदूत ठरल्याची भावना मंजुषा मेश्राम यांनी व्यक्त करुन आभार मानले.

लहान बाळांकडे आई-वडिलांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. कोणत्याही लहान वस्तू हातात लागू देवू नये, असे आवाहन डाॅ. मनीष मुंधडा यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये