ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वतः बनविलेली तलवार स्टेट्सला ठेऊन प्राणघातक हल्ला

पुर्वनियोजित कटात थोडक्यात बचावला चुलत भाऊ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

कटात इतर आरोपी सहभागी आहेत का या दृष्टीने तपास सुरु

सावली तालुक्यातील चारगाव येथील चुलत भावावर तलवारीने हल्ला करणारा कुणाल अनिल आडे याने हल्याच्या दिवशी वॉट्सअँपला तलवारीसह स्टेट्स ठेवल्याचे उघडकीस आले असून ती तलवार स्वतःच बनविल्याचे चौकशीत आढळले आहे. या प्रकरणी वडील अनिल आडे यास सहआरोपी केले असून आणखी या कटात कुणाचा सहभाग आहे का? या दृष्टीने सावली पोलीस तपास करीत आहेत.

       सावली तालुक्यातील चारगाव येथील नरेश आडे हा १ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान एका लहान मुलाला गाडीवर बसवून सावलीवरून डिझेल कॅन आणत असतांना टपून असलेल्या कुणाल अनिल आडे (वय २३) याने चारगाव नदीजवळ तलवारीने वार केला. यात नरेशच्या डोक्याला व हाताला लागल्याने गंभीर जखमी झाला. सोबत असणारा लहान मुलगा गाडीवरून पडला व लगेच पुलाचे काम करणाऱ्या मजुरांना हाक मारली. मजूर घटनास्थळी येताच आरोपीने पळ काढला.

याबाबत सावली पोलिसांना कळविले असता आरोपीस अटक करण्यात आली व भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ३(५) अन्वये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून सहआरोपी म्हणून मुख्य आरोपीचे वडील अनिल आडे यालाही अटक करून तुरुंगात पाठवले आहे. शेतीचा वाद असल्याने राग मनात ठेऊन आरोपीने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे मात्र आरोपी हा अनेक दिवसापासून नरेशला संपविण्याचा कट रचल्याचे चौकशीत आढळले आहे. गुन्ह्यात वापरलेली तलवार आरोपीने स्वतः बनविले व घटनेच्या दिवशी वॉट्सअँप स्टेट्सला ठेवल्याची धक्कादायक बाब बाब समोर आली असून अनेकांकडे स्क्रिनशॉट आहे . आरोपीने पूर्वनियोजित कट रचून कायमचा संपविण्याचा बेत असल्याचे दिसलें मात्र वार चुकल्याने नरेश थोडक्यात बचावला. आरोपीने खुनाचा प्रयत्न केला असून या कटात आणखी इतरांचा सहभाग असल्याची शंका चर्चील्या जात आहे.

      आरोपीने पूर्वनियोजित कट रचून हल्ला केला आहे. या कटात आणखी कुणी सहभागी आहेत का? या दृष्टीने तपास सुरु असून आरोपीचा मोबाईल जप्त केलेला असून सीडीआर प्राप्त झाल्यानंतर खरी माहिती मिळेल.

           सचिन मुसळे

 पोलिस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन, सावली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये