ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
दिगंबर जैन मंदिरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन ध्वजाची स्थापना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शहरातील १००८ श्री पार्श्वनाथ स्वामी काष्टासंघ दिगंबर जैन मंदिर व १००८ तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाज बांधवांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन जैन ध्वजा लावण्याची प्राचीन जुनी परंपरा असून आज गुढीपाडव्यानिमित्ताने सकाळी दहा वाजता भगवंतांच्या अभिषेकानंतर मंदिराच्या शिखरावरील जुने ध्वज काढून नवीन ध्वज सर्वांच्या उपस्थितीत मंत्र उपचार करीत लावण्यात आले.
यावेळी श्री पार्श्वनाथ स्वामी काष्टा संघ दिगंबर जैन मंदिराचे विश्वस्त मुकेश सिंगलकर, ऋषभ महाजन, जितेंद्र गिरीसावाले, योगेश खडकपूरकर, सह प्रदीप खडकपूरकर सुभाष सावजी खडकपूरकर सत्यकुमार अक्करबोटे, आशिष सिंगलकर, मंदिराचे पुजारी अमोल वायकोस उपस्थित होते