ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वराज्य कारभार चालविणारे, राष्ट्रवादाचे जिवंत प्रतीक – आ. जोरगेवार

स्वराज्य प्रतिष्ठाण हिंदुस्थान चंद्रपूरच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट

शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.  शिवरायांच्या राज्यात सर्व धर्मातील नागरिकांना समान न्याय दिल्या जायचा. प्रज्येला हवे ते काम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात केल्या जाईची म्हणून शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळाला रयतेचे राज्य म्हणुन संबोधल्या गेले असुन छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वराज्य कारभार चालविणारे, राष्ट्रवादाचे जिवंत प्रतीक होते. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.        

स्वराज्य प्रतिष्ठाण हिंदुस्थान चंद्रपूरच्या वतीने ३५० वा शिवराज्या भिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आकाश पाटील यांची मुख्य वक्ते म्हणून तर यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, माजी नगर सेवक सचिन भोयर, अजय वैरागडे, रमेश भुते, विजय पोहनकर, विजय चिताडे, उमेश आलनकर यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख मोठ आणि शूर नेतृत्व महाराष्ट्राला लाभने अभिमानाची बाब आहे. शिवरायांच्या राज्यात रयतेच राज्य होत. इतक मोठ साम्राज्य विस्तारीत होत असतांनाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगी अहंकार येऊ दिला नाही. अष्टपैलुत्वाने समृद्ध असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात सर्व धर्मातील नागरिकांना समान न्याय दिला जायचा. प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे ते राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे थोर कर्तुत्वान पुरुष होते, त्यांनी अतिशय खडतर परिस्थिती मधून केलेली स्वराज्य निर्मिती हे सर्व जनतेसाठी प्रेरणादायी आहे.  शिवरायांचे हिंदवी स्वराज्य म्हणजे भयमुक्त शासन होते. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्वधर्म समभावाची शिकवण छत्रपती महाराजांनी जगाला पटवून दिली. असे ते यावेळी म्हणाले. 

स्वराज्य प्रतिष्ठाणच्या वतीने अशा आयोजनाच्या माध्यमातून समाज निर्मीतीचे काम केल्या जात आहे. त्यांच्या या आयोजनाला युवकांची मिळत असलेली साथ अभिनंदनीय आहे. आपल्या तर्फे आयोजित केल्या जात असलेल्या समाज उपयोगी आयोजनात मी सर्दैव आपल्या सोबत असुन यासाठी शक्य ती सर्व मदत करण्याची आमची भुमीका असल्याचेही ते यावेळी म्हणाले. महिला, आणि विद्यार्थी या दोन घटकांना केंद्र स्थानी ठेवून आपण काम करत आहोत. महिलांना स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षम करण्यासाठी आपण विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहोत. सोबत शहरातील विविध भागात आपण १० भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. तर विद्यार्थ्यांसाठी आपण ११ अभ्यासिका तयार करत असल्याचे यावेळी ते म्हणाले. या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला युवकांची व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये