Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा भीमशक्ती मध्ये प्रवेश

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

राज्यसभा खासदार व माजी सामाजिक न्याय मंत्री मा. चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांचेवर विश्वास ठेऊन सिंदखेड राजा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाला सोडून भीमशक्ती या सामाजिक संघटना मध्ये प्रवेश केला बाळू भाऊ म्हस्के यांची सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तर मदन भाऊ म्हस्के यांची सिंदखेड राजा शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सिंदखेड राजा देऊळगाव राजा या मतदार संघातील वंचित च्या कार्यकर्त्यांनी तण मन धनाने एकनिष्ठ राहून काम केले ,कोणतीही अपेक्षा ठेवली नाही,पण पक्ष श्रेष्टींनी कधीच त्यांची दखल नाही घेतली कधीच त्यांना विश्वासात नाही घेतले न कधी त्यांचे मत जाणून घेतले न त्यांना मान सम्मान दिला ,अखेर त्यांनी माननीय चंद्रकांत जी हंडोरे साहेबाच काम बघितलं सामाजिक न्याय मंत्री असताना व आता राज्य सभा खासदार असताना सुद्धा जेव्हा साहेब समाजाची व्यथा संसदे मध्ये निर्भीड पणे मांडतात आणि त्यांचं कार्यकर्त्यान्वरच प्रेम काळजी, पदाधिकाऱ्यांना मिळणार मान सामान हे सगळं त्यांनी बघितल आणि हा निर्णय घेतला ,बुलडाणा जिल्ह्या भीमशक्ती च्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले,भीमशक्ती सामाजिक संघटना विदर्भ उपाधक्ष दिपक भाऊ कासारे, व जिल्हा अध्यक्ष प्रतीक भाऊ जाधव यांच्या प्रमुख उपस्थिती प्रवेश संपन्न झाला.

या वेळी आकाश कासारे,विजय कासारे, प्रवीण काकडे, रवी पिंपळे, मोहसीन शेख,अमर जाधव, मन्याभाई कासारे, नितीन पिंपळे,सुरज कासारे,करण पिंपळे, महेंद्र मगर,अतुल खरात,सुमित कासारे,जय डोंगरे,निखिल मगर,रितेश मगर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये