Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तीन शेतकरी “रेशीमरत्न” पुरस्काराने सन्मानित

वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

तूती आणि टसर रेशीम उद्योगातून एका वर्षात एक लाखापेक्षा जास्त आर्थिक उत्पन्न घेण्याया चंद्रपूरच्या यशस्वी शेतकऱ्यांना नुकतेच नागपूर येथे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वस्त्रोद्योग विभाग आणि रेशीम संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे 10 व्या राष्ट्रीय हातमाग दिवसाचे औचित्य साधून सण 2022-23 या वर्षात प्रति एकरी रुपये एकलाख पेक्षा जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या तीन शेतकऱ्यांना 9 ऑगस्ट रोजी नागपूर येथे सहपत्नीक सत्कार करण्यात आला.

चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम पुरस्कारासाठी चंद्रभागाबाई खट्टू मारभते व खटू मसाजी मारभते , द्वितीय पुरस्कार प्रभाबाई सुरेश वैरकार व सुरेश उपाशा वैरकार, तृतीय पुरस्कारासाठी इंदिराबाई यादव नान्हे व यादव वासुदेव नान्हे हे तिन्ही शेतकरी रा. मेंडकी, जी. ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून यान्हा प्रथम पारितोषिक 11 हजार रुपये, व शिल्ड द्वितीय पारितोषिक 7500 रुपये व तृतीय पारितोषिक 5 हजार रुपये शाल, श्रीफळ आणि शिल्ड देऊन गौरविण्यात आले यावेळी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेशीम शेतकऱ्यांशी संवाद साधत रेशीम शेतीतून मिळणारे यश व होणारा फायदा यांचा आढावा घेऊन रेशीम शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ आणि इतर सोयी सवलती उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले.

विशेष म्हणजे हे तिन्ही शेतकरी रेशीम कार्यालय पाथरीशी निगडित असल्याने पाथरी रेशीम कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून यापुढेही शेतकऱ्यांनी टसर शेतीची जास्तीत जास्त लागवड करून शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाला वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त मान. अविष्यात पंडा, रेशीम संचालनायाच्या संचालिका मान. वसुमना पंत, अतिरिक्त विभागीय आयुक्त मान. माधुरी चवरे-खोडे, वस्त्रोद्योग उपायुक्त मान. जोशी, रेशीम विभागीय उपसंचालक मा. महेंद्र ढवळे, सहाय्यक संचालक मा. हेमंत लाडगावकर जिल्हा रेशीम विकास अधिकारी मा.स्वप्निल तायडे, तसेच वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक जे. के. वाघमारे, वरीष्ठ क्षेत्र सहाय्यक जे. पी. जीवने, क्षेत्रसहाय्यक ए. एन. नाखले, क्षेत्रसहाय्यक पी. एम. चवखे, डी. डी. लाऊत्रे शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये