Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एक लक्ष्य, एक विचार’ या भावनेने कार्य करा

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

बल्लारपूर शहर व ग्रामीण भाजपा संमेलन

चंद्रपूर : देशातील जनतेची दिशाभूल करणे, संविधान धोक्यात असल्याचा कांगावा करणे आणि जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे राजकारण काँग्रेसने केले. लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुकीच्या प्रचाराला चोख उत्तर द्या. आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे एक लक्ष्य, एक विचार पुढे ठेवून कार्य करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

बल्लारपूर शहरातील एकदंत लॉन येथे बल्लारपूर शहर आणि ग्रामीणमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संमेलन रविवारी (ता.११) पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,लखनसिंह चंदेल,काशी सिंह, मनीष पांडे, निलेश खरबडे, समीर केणे, रणंजय सिंग, शिवचंद द्विवेदी, रेणुका दुधे, वैशाली जोशी, आशीष देवतळे, राजू दारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

‘संगठन गढ़े चलो, सुपंथ पर बढ़े चलो, भला हो जिसमें देश का, वो काम सब किए चलो’ या ब्रीदनुसार कामं करायचे आहे. खुर्ची प्राप्त करणे हे आपले ध्येय नाही. भाजपाचा कार्यकर्ता सत्तेसाठी नव्हे देशाच्या विकासासाठी काम करतो. तीच भावना कायम ठेवून येत्या काळात ‘बी फॉर भारत’, ‘बी फॉर बल्लारपूर’, ‘बी फॉर बीजेपी’ याच तत्त्वाने काम करा.’ ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा अनेक योजनांतून महाराष्ट्रातील महायुती सरकारने राज्यातील महिला, युवा आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. देशात सर्वाधिक पीक विमा चंद्रपूर जिल्ह्यात झाल्याचे देखील त्यांनी सांगितले.

संविधानाचा खोटा प्रचार आणि अनुसूचित जाती-जमातीच्या बांधवांची काँग्रेसने केलेली दिशाभूल ही देखील लोकसभेतील पराभवाची कारणे आहेत. भाजपा दलितविरोधी असल्याचा अपप्रचार काँग्रेसने केला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्वत: काँग्रेसचा विरोध करायचे. ‘काँग्रेस हे जळते घर आहे. जो यात जाईल तो भस्म होईल,’ असे ते म्हणायचे. त्याच बाबासाहेबांचे नाव वापरून काँग्रेसने खोटा प्रचार केला आणि समाजाची दिशाभूल केली. खरे वास्तव पुढे आणण्यासाठी जनतेत जाऊन त्यांना वास्तवाची जाणीव करून देण्याची गरज आहे. आज काँग्रेस जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. अशात आपले नाव आग लावणाऱ्यांत नाही तर आग विझविणाऱ्यांत घेतले जावे, याच हेतून आणि पवित्र उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून काम करण्याचे आवाहन देखील ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना केले. सोशल मीडिया हे आजच्या युगातील मोठे अस्त्र,शस्त्र आहे. त्याचा उपयोग योग्यप्रकारे करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाने ‘हर घर तिरंगा’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाचे योग्य नियोजन करावे. आणि जास्तीत जास्त नागरिकांना अभियानात सामील करून घ्या, असे आवाहन ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये