Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनपाच्या ५ वितरण केंद्रांद्वारे राष्ट्रध्वजाचे वितरण सुरु  

अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- केंद्र आणि राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज उंचाविणे अपेक्षित आहे. मनपाच्या ५ कार्यालयामार्फत नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने नियोजन केले असुन ९ ऑगस्ट रोजी मनपा मुख्य कार्यालय येथे राष्ट्रध्वज वितरण केंद्राचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

    नागरीकांना ध्वज सहजतेने उपलब्ध व्हावा यादृष्टीने महानगरपालिकेतर्फे नियोजन करण्यात आले असुन मनपा मुख्य इमारत, ३ झोन कार्यालये, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय ज्युबिली हायस्कूल अश्या ५ केंद्रांवर ध्वज वितरण सुरु करण्यात आले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा हर घर तिरंगा अभियानाचा उद्देश आहे.

    १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आपल्या घरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा करून अभियानात सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.उद्घाटनप्रसंगी उपायुक्त प्रदीप भेलावे, उपायुक्त मंगेश खवले,रफीक शेख,सिद्दिक अहमद तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये