Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी सज्ज व्हा – जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम

वरोरा भद्रावती - विधानसभेतील पदाधिकारी व नगरसेवक यांची आढावा बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       आगामी विधानसभा निवडणूक व भगवा सप्ताह निमित्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व नगरसेवक यांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज व्हा अश्या सूचना जिल्हासंपर्क प्रमुख यांनी आढावा बैठकीत दिल्या आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दिनांक 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनात “भगवा सप्ताह” राबविला जात आहे.

या सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण विधानसभेतील गावागावात सदस्य नोंदणी अभियान, शिवसंपर्क अभियान, मतदान यादी पडताळणी, सामाजिक उपक्रम, गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक अभियान, राज्य व केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात जनजागृती अभियान व गावागावात पक्षाचे चिन्ह व कार्य पोचविण्याचे काम जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. त्यानिमित्ताने विधानसभेचा आढावा घेण्याकरिता जिल्हा संपर्कप्रमुख तथा मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा प्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात शिवसेना विधानसभा जनसंपर्क कार्यालयात पक्षाचे सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व महिला संघटिका यांची आढावा बैठक दिनांक ८ ऑगस्ट रोजी संपन्न झाली.

या बैठकीमध्ये भगवा सप्ताह निमित्त मार्गदर्शन तथा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसैनिकांनी पक्षाचे धेय्य धोरण व कार्य आणि केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या योजनांची पोल खोल करावी व विधानसभा निवडणुकीत मैदान मारण्यासाठी सज्जे व्हावे अशा सूचना केल्या. तसेच मतदान जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी युवासेना जिल्हाप्रमुख तथा गोंदिया जिल्हा विस्तारक मनीष जेठाणी उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, आदीवासी नेते रमेश मेश्राम,विधानसभा संघटक सुधाकर मीलमिले,नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगरसेवक सुनील सातपुते, विनोद वानखेडे,शोभा पारखी,रेखा खुटेमाटे,लक्ष्मी पारखी,वरोरा नगर पालिकेचे माजी नगरसेवक किशोर टिपले दिनेश यादव, सुषमा भोयर,प्रणाली मेश्राम, वरोरा शहर प्रमुख संदीप मेश्राम, उपशहर प्रमुख मनीष दोहतरे,बंडू चटपल्लीवार, युवासेनेचे महेश जिवतोडे,निखिल मांडवकर, ओंकार लोडे,अक्षय झीले,पियूष सिंग,कीर्ती पांडे,रोहिणी जिवतोडे,वंदना डाखरे,नितीन कवासे,अरविंद खोबरे, प्रकाश पाकमोडे,जितेंद्र गुलानी, सूरज डाखरे संतोष सहारे,सुधाकर जूनघरे, विनायक बांदुरकर, चंपत नन्नावरे,सचिन राऊत, ईशांत मांगळूरकर, श्याम शोक दडमल आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये