शिक्षण विकास अधिकारी विशाल बोधाने महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
शिक्षण विकास अधिकारी विशाल नारायणराव बोधाने यांनी प्राध्यापक पदासाठी पात्रतेचा निकष असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या ७ एप्रिल २०२४ च्या सेट परीक्षेत पहिल्याच प्रयत्ना त नेत्रदीपक यश संपादन केले या परीक्षेत विशालने शिक्षणशास्त्र विषय घेऊन परीक्षा दिली. मागील वर्षी त्यांनी राज्यशास्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली,पेपर एक मध्ये ६४ गुण तर पेपर दोन मध्ये विक्रमी असे १२२ गुण प्राप्त केले होते विशाल बोधाने हे नुकतेच विभागीय परीक्षा उत्तीर्ण करुण सध्या पंचायत समिति चिमूर येथे शिक्षण विस्तार अधिकारी पदावर रुजु झाले आहे यापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोला केंद्र चनई, पंचायत समिती कोरपना अंतर्गत सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत होते.
लहान बालकांना शिकवण्या सोबतच स्वतःच्याही ज्ञानात भर घालणाऱ्या विशालने विविध विषयातील उच्च शिक्षणाच्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत .सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, ग्रामविकास आणि क्रिडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या विशालचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, पत्नी, सहकारी व मित्रांना दिलेले आहे.