Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाकेबंदी करुन चारचाकी वाहनासह देशी विदेशी, दारुचा साठा जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 07/08/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अँटी गँग सेल व हिंगणघाट पथक पो स्टे सावंगी मेघे परीसरात गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर प्रो.रेड कामी रात्र पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून सिंधी मेघे येथे राहणारा हद्दपार इसम तुषार बदलामवर हा त्याचे साथीदारासह त्याचे ताब्यातील पांढरा रंगाची swift डिझायर गाडी क्रमांक एम एच 32 B 0958 हा अमरावती येथून समृध्दी महामार्ग ने येलकेली मार्ग वर्धा त्याचे राहते घरी देशी विदेशी दारूसाठा घेवून येत आहे अश्या माहिती वरून समृध्दी महामार्ग येळाकेली चौक येथे नाकेबंदी करून त्यांचेवर घेराव टाकुन प्रो रेड केला असता आरोपी :- 1) तुषार उर्फ कचकन प्रभाकर बदलामवर, वय 28 वर्ष, रा. सिंधी मेघे वर्धा 2) मयूर प्रकाश मंद्रिले, वय 24 वर्षे, रा. स्नेहल नगर 3) अंकुश रामदास भट वय 20 वर्ष, रा. पवनार, वर्धा याचे ताब्यातुन पंचांसमक्ष

 जप्त माल वर्णन :1) 02 खर्ड्याच्या खोक्यात आफीसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल.च्या 60 सिलबंद शिश्या ज्याचा बेंच न 196/24 दिनांक 24/07/24 प्रतीनग 350 रु. प्रमागणे 21,000 रु 2) 05 एका खर्डाच्या खोक्यात oc कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 240 सिलबंद शिक्या ज्याचा बॅच नं 160/24 दिनाक 06/07/24 प्रतीनग 300 रु. प्रमाणे 72,000 रु3) एका खर्डाच्या खोक्यात RS कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 24 सिलबंद शिश्या ज्याचा बॅच नं 1254 दिनाक 29/07/24 प्रतीनग 350 रु. प्रमाणे 8,400 रु 4) एका खर्डाच्या खोक्यात RC कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 36 सिलबंद शिश्या ज्याचा बॅच नं 323 दिनाक 18/07/24 प्रतीनग 350 रु. प्रमाणे 12,600 रु 5) एका खर्डाच्या खोक्यात आयकॉनिक कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 24 सिलबंद शिश्या ज्याचा बॅच नं 172 दिनाक 16/07/24 प्रतीनग 350 रु. प्रमाणे 8,400 रु 6) 01खर्डाच्या खोक्यात देशी कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 90 एम.एल च्या 400 सिलबंद शिश्या ज्याचा बॅच नं R V 241 दिनाक 07/24 प्रतीनग 100 रु. प्रमाणे 40,000 रु7) 02 अँड्राईड मोबाईल की 40,000/- रु 8) एक पांढरा रंगाची swift कार डिझायर क्रमांक एमएच 32 B 0958 चारकाची गाडी किमत 5,00,000 रू .असा एकुण जु.कि. 7,02,400/- चा मुद्देमाल* जप्त करून आरोपी तुषार व मयुर याला जप्त दारुबाबत विचारणा केली असता यांनी संगनमताने आरोपी 4) रुपेश कांबळे, रा. सिंधी मेघे (पसार) याचे सांगणेप्रमाणे आरोपी क्र 5) बार मालक रा. राजापेठ अमरावती (नाव माहित नाही) (पसार) येथील बार मालक यांचेकडून दारुमाल विकत आणला अशी माहिती दिली. सदर हद्दपार इसम तुषार याने मनाई आदेशाचे उल्लंघन करून देशी विदेशी दारूची वाहतूक करीत असताना मिळुन आल्याने सर्व आरोपीतांविरुध्द पो स्टे सावंगी मेघे येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला. तिन्ही आरोपी यांस रितसर पुढील तपास कामी ताब्यात दिले.

 सदर कारवाई मा. श्री. नुरुल हसन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पो उप नि अमोल लगड, पो.हवा. गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, रितेश शर्मा, पोलीस अंमलदार मनिष कांबळे, गोपाल बावनकर, मंगेश आदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये