Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खामोना शेत शिवारात सोलर पॅनल व विद्युत मोटार पंपचे केबल चोरट्याची धुमाकूळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

राजुरा तालुक्यातील मौज खामोना सौ रुखमाबाई जयराम लोहबडे शेत सर्वे नंबर 128 या शेतामध्ये असलेल्या सोलर चे शासकीय योजनेअंतर्गत सोलर पॅनल शेतात लावण्यात आले आणि ते नेहमी चालू होते परंतु दिनांक 8/5/2021 च्या रात्री अज्ञान चोरट्याने मोटार चे केबल व सोलरचे पितळी नेटवर्क साहित्य सोलर ची वायरिंग इत्यादी चोरून नेले त्यावेळी सुद्धा राजुरा पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देण्यात आली होती मात्र चोरांचा पत्ता लागलेला नाही शेताचा हंगाम लागतातच शेतमालकांनी स्वखर्चाने सदर साहित्य घेऊन सोलर व मोटार पंप चालू करण्यात आले.

परंतु त्याच शेतात 7 अगस्ट 2024 रोजी रात्र च्या वेळी अज्ञान चोरट्याने साहित्य नेल्यामुळे वारंवार अशी घटना घडत राहिली तर किती वेळा कास्तकारांनी साहित्य घेऊन चालू करायचे तथा कशी शेती करायची असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण होत आहे याकडे राजुरा पोलीस स्टेशन गांभीर्य लक्ष देऊन अज्ञान चोरट्यांना पकडावे अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये