Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर येथे राष्ट्रीय रसायन शास्त्र दिवस साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर येथे दि. ०२ ऑगस्ट २०२४ ला आचार्य पी. सी. रे ( Sir P. C. Ray) यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव व तसेच श्री रामकृष्ण पटले, रसायनशास्त्र विभाग प्रमुख, चेतन वैद्य सहाय्यक प्राध्यापक रसायनशास्त्र विभाग, श्री पवन चटारे, भौतिक शास्त्र विभाग प्रमुख विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन बीएससी द्वितीय वर्षाची अष्टमी मुंडे या विद्यार्थीनी ने केले. या कार्यक्रमाचे वक्ते प्रा .रामकृष्ण पटले यांनी रसायन शास्त्र या विषयाचे महत्त्व कळविले व विद्यार्थ्यांना विषयात भविष्यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रात नोकरीची संधी आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिली. तसेच प्राध्यापक चेतन वैद्य आणि प्रा.पवन चटारे यांनी विषयाबद्दल अधिक माहिती दिली.

प्राचार्य शैलेंद्र देव यांनी विद्यार्थ्यांना या विषयाकडे विशेष लक्ष देऊन अभ्यास करावे आणि या विषयात आपले कौशल्य प्राप्त करावे असे आव्हान केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बीएससी द्वितीय वर्षाला शिकत असलेली विद्यार्थिनीने केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये