ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमय्या पॉलीटेक्निक येथे वृक्षारोपण

वृक्षलागवडीच्या मोहिमेत सहभागी व्हा - श्री.पी.एस.आंबटकर यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट

स्वत्रंत दिनाच्या निमित्याने सोमय्या पॉलीटेक्निक येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ. प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख सर, उपप्राचार्य दीपक मस्के सर रजिस्टर बिसन सर उपस्थित होते.

वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्ताने संस्थेच्या आवारात वृक्षाची लागवड करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व विध्यार्थाना मार्गदर्शन करण्यात आले. आज चंद्रपूर शहर व संपूर्ण देशाचा विचार केला असता वाढते प्रदूषण, निसर्गाप्रती असलेली अनास्था या सर्व गोष्टी टाकून निसर्गाप्रती प्रेम व आपुलकी असली पाहिजे . आज आपण निसर्गाकडून सर्व गोष्टी घेत असतो. पण त्याप्रती सुद्धा आहि देणे लागते, या गोष्टीचा विचार करीत नाही. महाराष्ट्र शासनाने वृक्षलागवडीची चळवळ निर्माण करून समाजाला जागृत करून हि चळवळ व्यापक करण्याचा प्रयत्न केला. या चळवळीमध्ये सोमय्या पॉलीटेक्निकच्या विध्यार्थांचा सिहांचा वाट आहे. तरी सर्वानी वृक्षरोपण करून आपले योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.

वृक्षरोपण केल्याने विकासात भर पडणार असून यामुळे सामाजिक स्वास्थ जपण्यास मदत होणार आहे. संपुर्ण वृक्षाची देखभाल सर्वांची आहे तसेच परिसर हिरवेगार होणार आहे.

या कार्यक्रमाकरीत संस्थेतील सर्व विधार्थी, विधार्थिनी, तसेच सर्व विभाग प्रमुख प्रा. नागराळे सर, प्रा. बोबडे सर, प्रा. कोटकर मॅडम, प्रा. केटी सर, प्रा. रेवतकर मॅडम, प्रा. सुत्राळे सर, प्रा. पोहनकर सर, प्रा. आंबटकर सर, प्रा. ठाकरे, प्रा. जंगम मँडम, प्रा. डॉ. चव्हाण सर. प्रा. बाबरे सर. प्रा. बल्लमवार मॅडम, प्रा. सोडवले सर. प्रा. तरवटकर मॅडम, प्रा. जेणेकर मॅडम, प्रा. ऐकरे मॅडम, प्रा. घरडे मॅडम, राघाताटे मॅडम, प्रा. पाटील मॅडम, प्रा. मोहुर्ले सर, प्रा. कारमोरे मॅडम, प्रा. डे, प्रा. कुलकर्णी सर, प्रा. वसीम सर, प्रा. डोबळे मॅडम, ग्रंथपाल घटे मॅडम उपस्थित होते, संचालन प्रा. सिद्धकी सर यांनी केले या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये