ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भीम सैनिक अक्षय भालेराव यांचा खून करणाऱ्या जातीयवादी गुंडांना फासीशी शिक्षा हेच प्रायचित्त! – महेंद्र मुनेश्वर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे आरोपी षंढांचा व राज्य सरकारचा जाहीर निषेध !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

“नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली या गावात कुटुंबांनीशी राहणाऱ्या अक्षय भालेराव या आंबेडकरी कार्यकर्त्याचा, जातीयवादी सनातनी गुंडांनी, संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणुन खून केला.यातील आरोपी असलेल्या निर्लज्ज सनातनी “दोषींवर ॲट्रोसिटी व हत्येचा कट यासकट फाशीची शिक्षा देण्यासाठी खुनाच्या घटनेची उच्चस्तरीय (सी.आय.डी – एस.आय.टी) मार्फत चौकशी करण्यात यावी .”महात्मा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्टात ही घोर निंदनीय वेदनादायक घटना आहे.त्यामुळे खुनाच्या आरोपातील जातीयवादी षंढानचा व राज्य सरकारचा तीव्र पणे जाहीर निषेध आम्ही करतो.आंबेडकरी कार्यकर्त्याचा क्रूरपणे खून करणाऱ्या जातीयवादी गुंडांना फासीशी शिक्षा हेच आता प्रायचित्त आहे.या खुनी गुंडांना महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकारने जातीयवाद पत्करुन वाचवू नये.असे निवेदन जिल्हाधिकारी वर्धा यांना,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी दिले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या वतीने सदरहू घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या निर्देशानुसार निवासी जिल्हाधिकारी अर्चना मोरे वर्धा यांना आज दिनांक ०६ जून २०२३ रोजी निवेदन देण्यात आले.राज्याचे गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व प्रशासनाने “दोषींवर ॲट्रोसिटी व हत्येचा कट यासकट घटनेची उच्चस्तरीय (सी.आय.डी – एस.आय.टी) मार्फत चौकशी करुन गंभीरतेने कार्यवाही करावी व खुनातील सर्व जातीयवादी मुख्य सूत्रधार आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या दिशेने पोलिस यंत्रणेला तपास करण्याचे निर्देश द्यावे असेही कृज्ञतापूर्वक निवासी जिल्हाधिकारी अर्चना मोरे वर्धा, यांना दिलेल्या निवेदनातून कळविले आहे.

नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली या गावात संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून,गावातून मिरवणूक काढली म्हणून गावातीलच,जातीयवादी १० ते १२ सवर्ण गावगुंडानी व समाजकंटकांनी भीम सैनिक अक्षय भालेराव याची निर्घृण हत्या केली.त्याचा भाऊ,आई,वडील यांना ही गंभीर मारहाण केली.एवढेच नव्हे तर बौद्ध वस्तीवर दगडफेक करून दहशत निर्माण केली.ही बाब अत्यंत संतापजनक असून स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर सुद्धा जातीयवाद मिटलेला नाही याची प्रचिती येते असेही रिपब्लिकन पक्षाचे नेते महेंद्र मुनेश्वर यांनी निवेदनात म्हटले आहे.
१)सदर घटनेची उच्चस्तरीय (सी.आय.डी/एस.आय.टी) मार्फत चौकशी करण्यात यावी.
२) दिवंगत अक्षय भालेराव यांना व त्यांच्या कुंटुबियांना न्याय मिळावा यासाठी सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा.
३)अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त आर्थिक मदत महाराष्ट्र सरकारने करावी.
४) त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे.

वरील मागण्या जिल्हाधिकारी वर्धा यांनी त्वरित महाराष्ट्र शासनाकडे पाठवाव्यात.दिवंगत अक्षय भालेराव हा आंबेडकरी कार्यकर्ता होता.भालेराव यांच्या कुटुंबासोबत आणि बोंढार गावातील आंबेडकरी समुहासोबत आम्ही , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन विचाराचे कार्यकर्ते ठामपणे उभे आहोत.सदरहू वेदनादायी घटनेचा व सुस्त प्रशासन यंत्रणेचा ” रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षा च्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असुन मारेकऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे जिल्हा संघटक समाधान पाटील,जिल्हा सचिव सुभाष कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष राजु थूल,वर्धा तालुका अध्यक्ष सुनिल वनकर,वर्धा विधानसभा अध्यक्ष रुपेश नागदिवे,तालुका उपाध्यक्ष अरविंद भगत, तालुका सचिव सुरेश आगलावे,जिल्हा महासचिव सुधीर सहारे,जिल्हा युवा आघाडीचे अंकित रामटेके,गोवर्धन नगराळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली आहे.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये