विद्यार्थ्यांसाठी तात्काळ बस सेवा सुरू करण्याची कुणबी समाज संघर्ष समितीची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी-देसाईगंज महामार्गावरील नवीन पुलाचे बांधकामामुळे जुने भुतीनाला पुल तोडण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा ब्रह्मपुरीशी संपर्क तुटला आहे आणि परिसरातील विद्यार्थ्यांचे ब्रह्मपुरीकरिता येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे बस सेवा सुरू करण्यात यावे याकरिता कुणबी समाज संघर्ष समितीने उपविभागीय अधिकारी, आगार व्यवस्थापक ब्रह्मपुरी यांना निवेदनातून बस सुरू करण्याची मागणी केली.
कुणबी समाज संघर्ष समिती, ब्रह्मपुरी यांनी उपविभागीय अधिकारी, ब्रह्मपुरी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे की, सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तात्काळ बस सेवा उपलब्ध करून द्यावी. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, बस सेवा तात्काळ उपलब्ध करून न दिल्यास नागरिक आणि विद्यार्थी मोठे आंदोलन उभारतील आणि त्याचे परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.
समितीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार किर्तिकुमार भांगडिया यांनाही निवेदन पाठवले आहे. उपविभागीय अधिकारी सायंकाळी ८ ऑगस्टला समितीसोबत भेट घेऊन उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
बस व्यवस्थापक आगार व्यवस्थापकांनी सुद्धा निवेदन स्वीकारले आहे, परंतु त्यांनी बस सुरू न करण्याचे कारण विजेच्या लाइनचा आणि रस्त्याच्या बांधकामाचा कारण पुढे केले. विद्युत अभियंता यांनी सांगितले की, ट्रॅव्हल्स त्या रस्त्याने सुरू आहे आणि बस देखील जाऊ शकते, जरी समस्या असेल तर त्ती पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.
वरील निवेदनाच्या माध्यमातून समितीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन तात्काळ बस सेवा पुरवण्याची विनंती केली आहे. जर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केली नाही तर समिती तीव्र आंदोलन उभारणार आहे असा इशारा विनोदराव झोडगे पाटील,वासू सौंदरकर, राहुल भोयर,मामाजी वझाडे,कृष्णा शहारे,नानाजी तुपट,अँड मनोहर उरकुडे,अँड हेमंत उरकुडे,रुपेश देशमुख, शिदेशवर भरें,अमृत नखाते,अनिल दोणाडकर,धनराज ठाकरे,भास्कर नाकतोडे,संजू बगमारे, निहाल ढोरे,जगदीश तलमेले, प्रेमलाल धोटे,मंगेश फटीग,सुरेश दर्वे,वामन मिसार,गजानन ढोरे,हिरालाल ठेंगरी,विलास दूपारे, प्रेमलाल शेंडे,गिरिधर गुरपुडे,राजेश उरकुडे,गजानन माकडे,गणेश पीलारे,राजेश पारधी,महादेव राऊत,शामराव कुथे,हरिदास दुपारे,सागर नखाते,मोरेश्वर दर्वेनी दिला आहे.