ग्रामीण वार्तामहाराष्ट्र

स्टूडंट कॉम्प्युटरमध्ये “करियर मार्गदर्शन शिबिर, सत्कार समारंभ संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा.शेखर प्यारमवार

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित तर्फे स्टूडंट कॉम्प्युटर एज्युकेशन सावली केंद्रामध्ये शिकत असलेले एम एम सी आय टी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअरची नवी दिशा या उपक्रमात एमकेसिएलच्या तज्ञाकडून विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन करण्यात आले आणि विद्यार्थांच्या मनातील काही प्रश्न तज्ञांना विचारण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे तज्ञांकडून देण्यात आली.

हा कार्यक्रम गूगल मिट तंत्रज्ञानाद्वारे स्टूडंट कॉम्प्युटर एज्युकेशन सावलीमध्ये सोमवार दिनांक ०५ जून २०२३ ला ठीक सकाळी १० वाजता सुरू झाला दुपारी २ वाजताच्या दरम्यान कार्यक्रम पार पडला.

त्यानंतर स्टूडंट कॉम्प्युटर एज्युकेशन सावली येथे १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्रावर सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती त्याचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये प्रथान क्रमांक स्नेहा बबनराव सोनटक्के व्दितीय क्रमांक सृष्टी रविंद्र गोहणे, तृतीय क्रमांक संतोषी संदिप गावडे हिने पटकाविला. या तीन विद्यार्थिनींना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपचंद लाटेलवार आभारप्रदर्शन अमित डोंगरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काजल खोब्रागडे, करण चौधरी, रितिक शेंडे, मानसी लाटेलवार, स्वाती दुधे यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये