ग्रामीण वार्तामहाराष्ट्र

एनसीसी व केजे सिंग कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्याकरिता शिवसेना उद्धव ठाकरे गटाने वाहतूक बंद करून आंदोलन केले त्या करिता शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्यासह सुमारे 50 जणांवर गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

तालुक्यातील माजरी येथे कोळसा उत्पादनासाठी आलेल्या एनसीसी कंपनी आणि केजे सिंग कंपनीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी वाहतूक बंद आंदोलन करत सरकारच्या आदेशाला न जुमानता 80 टक्के स्थानिकांना खाजगी कंपनीत सामावून घेण्या करिता आंदोलन उभारले होते त्या आंदोलनामुळे वेकोलीचे खूप मोठे नुकसान झाल्याने माजरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिव सेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्यासह सुमारे ५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. माजरी ग्रामपंचायत हद्दीत एनसीसी कंपनी आणि केजे सिंग कंपनी कोळसा उत्पादनासाठी आली असून, ही कंपनी स्थानिक लोकांना न घेता बाहेरच्या राज्यातून लोकांची भरती करत आहे.
त्या करिता स्थानिक लोकांना रोजगार मिळावा या साठी एनसीसी कंपनीला 6 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा स्थानिक लोकांना रोजगार देण्यासाठी कंपनीच्या विरोधात संघर्ष करू, असा इशारा देण्यात आला होता. या वेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुकेश जीवतोडे यांनी 5 वाजता आंदोलनस्थळी पोहोचुन एनसीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. स्थानिक जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेसह सर्व स्थानिक राजकीय पक्ष, माजरी परिसरातील सर्व सामाजिक संघटनांनी खासगी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी वाहतूक बंद ठेवून आंदोलन केले होते. त्यामुळे वेकोली माजरी परिसरात रु.42,06,6,47/- चे आर्थिक नुकसान झाले असल्याची माजरी पोलीस ठाण्यात उपक्षेत्रीय प्रबंधक वर्मा यांनी लेखी फिर्याद दिल्याने माजरी पोलिसांनी मुकेश जीवतोडे शिवसेना जिल्हाप्रमुख वरोरा (उद्धव ठाकरे गट), युवासेना जिल्हाप्रमुख मनीष जेठानी वरोरा त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते अमित निब्रड, सरताज सिद्धीकी आर. माजरी, रमेश मेश्राम रा.वोरा, दिनेश यादव, बंडू डाखरे, राजू आसुटकर, किशोर टिपले, महेश जीवतोडे, इम्तियाक सिद्दीकी, सचिन तुळशीराम साठे. जानू यदुवंशी, मनोज चौधरी, समीम सिद्दीकी, सद्दाम सिद्दीकी, सर्व माजरी व इतर 25 ते 30 महिला व पुरुष कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये