ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

महावितरणचा १८ वा वर्धापन दिन उत्साहाने साजरा

चांदा ब्लास्ट

महावितरणचा १८ वा वर्धापन दिन ६जून रोजी उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी धकाधकीचे कामात व्यस्त् असणाऱ्या महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील अभियंता, अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांना उपलब्ध करून देण्यात आली.

स्थानिक शकुंतला लॉन येथे येथे आयोजित या कार्यक्रमाचे, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन दिपप्रज्वलांने पार पडले. याप्रसंगी, अधीक्षक अभियंता सुहास मेत्रे (पायाभूत आराखडा )व अधीक्षक अभियंत्या श्रीमती. संध्या चिवंडे व सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. रामचंद्र वैदकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जोपासून व ग्राहकांना दर्जेदार विजेसेवा पुरविण्याचे उद्दिष्ट साधून महावितरण चे अभियंता, अधिकारी व कर्मचारी – प्रसंगी ऊन, वारा, पाऊस, पुरासारख्या विपरीत परिस्थितीत विजसेवा पुरविण्याचे व्रत पार पाडत प्रकाश पोहोचवीत असून याबद्दल मुख्य अभियंता श्री. देशपांडे यांनी, त्यांचे अभिनंदन व कौतुक केले व त्यांना त्यांच्या धकाधकीच्या जीवनात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद व सकारात्मक ऊर्जा घेत मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. खास कर्मचाऱ्यांसाठी दिवसभर आयोजित विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आयोजित नृत्य व गायन स्पर्धेत बालगोपाळांनी मनमुराद आनंद लुटला. त्यांना यावेळी प्रशास्थिपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये