ग्रामीण वार्तामहाराष्ट्र

भारी येथे शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव उपकेंद्र भारी येथील अधिकारी व कर्मचारी हजर होते.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र शासनाच्या “शासन आपल्या दारी” योजनेअंतर्गत जीवती तालुक्यातील डोंगराळ, आदिवासी बहुल अतिदुर्गम मौजा भारी या गावांमध्ये “शासन आपल्या दारी” हा उपक्रम 8 जून ला घेण्यात आला .

यावेळी राजुरा विधानसभा चे .आमदार श्री.सुभाषभाऊ धोटे,चंद्रपूरचे जिल्हाधिकारी श्री विनय गौडा, जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जॉन्सन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर प्रकल्प संचालक श्री. मृगनाथाम तसेच राजूराचे उपविभागीय अधिकारी श्री संपत खलाटे व जिवती तालुक्यातील सर्व विभागांचे प्रमुख हजर होते.

यावेळी आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, जननी सुरक्षा योजना, आदिवासी मातृत्व योजना,तसेच निशय पोषण योजना च्या लाभार्थ्यांना आर्थिक लाभ दिल्या बाबतचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
तसेच आरोग्य विभागामार्फत क्षयरोग, हिवताप, हत्तीरोग ,कुष्ठरोग आदींची प्रदर्शनी लावण्यात आली.
व या व्यतिरिक्त सर्व आरोग्य विभागाच्या योजनांचे फलके सुद्धा प्रदर्शित करण्यात आली होती.
उपस्थित गावकऱ्यांची व कर्मचाऱ्यांची मधुमेह,रक्तदाब व इतर आजारांची तपासणी करण्यात आली
त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव उपकेंद्र भारी येथील अधिकारी व कर्मचारी हजर होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये