वर्धा उपविभागीय पोलीस पथकाने दारूचा माल केला जप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 26.07.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांना गोपनिय माहीती मिळाली की, रितेश शामकिशोर कंजर रा. कंजर मोहल्ला चंद्रपुर हा बसनी चंद्रपुर येथुन वर्धा येथे देशी दारूचा माल घेवुन आला आहे व तो अॅटोची वाट बोरगांव (मेघे) चौकात कुंदन पानटपरी जवळ चार कापडी बॅग मधे देशी दारूचा माल घेवुन उभा आहे.
अशी माहीती मिळाली वरून पंच व पोलीस स्टॉफचे मदतीने आरोपी यांचेवर बोरगांव (मेघे) चौकात कुंदन पानटपरी जवळ जावुन प्रोव्हीशन रेड केला असता आरोपी नामे रितेश शामकिशोर कंजर वय 33 वर्ष रा. चौहान कारखाना जवळ जल नगर वार्ड कंजर, मोहल्ला जि. चंद्रपुर याचे ताब्यातुन चार कापडी बॅग मध्ये 1) 90 एम.एल.च्या टॅगो कंपनीच्या देशी दारूने भरलेला एकुन 600 शिष्या प्रती नग 100 रू प्रमाणे 60,000/- 2) 04 नग कापडी बॅग प्रती कि 200/- रू प्रमाने 800/- रूरू असा एकुन जु.की 60,800 /- रू चा माल अवैध्यरित्या विनापास परवाना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आले.
तसेच सदर आरोपी वर्धा शहर पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे आरोपी विरूध्द 1) अपराध क्रमांक 1193/2024 कलम 65 ई, 77 अ, म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. वर्धा शहर येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री. प्रमोद के. मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पोलीस कर्मचारी मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.



