केंद्रीय विद्यालय विभागीय मुलींच्या बाक्सींग स्पर्धेत भद्रावती येथील जुळ्या बहिणींचे यश
सुवर्ण व कास्य पदक प्राप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भुसावळ येथे नुकत्याच पार पडलेल्या केद्रीय विद्यालय विभागीय मुलींच्या बाक्सींग स्पर्धेत आयुध निर्माणी येथील केंद्रीय विद्यालयात शिकत असलेल्या रिद्धी नितीन आमने व सिध्दी नितीन आमने या जुळ्या बहिणींनी आपला नेत्रदिपक खेळ सादर करीत उल्लेखनीय यश प्राप्त करीत भद्रावती शहराचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत रिध्दी आमने हिने सुवर्णपदक तर सिध्दी आमने हिने कास्य पदक प्राप्त केले आहे.
या यशामुळे भविष्यात होणाऱ्या केंद्रीय विद्यालयाच्या राष्ट्रीय स्पर्धेतील प्रवेशांचा मार्ग मोकळा झाला आहे. रिध्दी, सिध्दी यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील, समस्त आमने परिवार, बाक्सींग प्रशिक्षक व केंद्रीय विद्यालयातील सर्व शिक्षक वृंदाला दिले आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल रिध्दी, सिध्दी व आमने परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.



