Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव निकाली काढणेकरीता शिबिराचे आयोजन करावे

विनोद गावंडे यांची शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

            महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. वेतन २०१९/प्र. क्र.४८/टीएनटी-३, दिनांक १४/०३/२०२४ चे निर्णयानुसार राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिनांक ०१/०१/२०२४ पासुन (२४ वर्ष सेवेची) दोन लाभांची सुधारित आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे.

            मान. शिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. चंद्रपूर यांनी जिल्हातील सर्व मुख्याध्यापक यांना सदर शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी अशा आशयाचे पत्र निर्गमित केले होते. त्यानुसार काही शाळेकडून शिक्षण विभागास शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्यासंबंधी प्रस्ताव सादर करण्यात आलेले असून त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

          मान.अध्यक्ष कार्यबळ गट तथा शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर यांचे पत्र क्र. शिउसं/कार्यबळ गट/५०८२/२०२४, दिनांक १९/०७/२०२४ अन्वये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सुधारित सेवातंर्गत आश्र्वासित प्रगती योजनेचे लाभ मंजुरीचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी काढून त्यानुसार लाभामुळे देय वेतन निश्चितीची प्रकरणे पडताळणी करिता लेखाधिकारी (शिक्षण) यांचेकडे प्रस्तुत करणे आवश्यक राहील व ही कार्यपद्धती अंमलात आणण्यात यावी असे पत्र निर्गमित केलेले आहे.

    तरी मान.शिक्षणाधिकारीसाहेब (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. चंद्रपूर यांनी शासन निर्णय तथा मान.शिक्षण उपसंचालकसाहेब यांचे पत्रानुसार शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक ०१/०१/२०२४ पासुन (२४ वर्ष सेवेची) दोन लाभांची सुधारित आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणेस्तव शिबिराचे आयोजन करून प्रस्ताव लवकरात लवकर निकाली काढावे. अशी मागणी विनोद रा.गावंडे,जिल्हा कार्यवाह, चं.जि.खा.शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये