Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी भर पावसात चक्काजाम आंदोलन

ब्रह्मपुरी शहर कडकडीत बंद ; जिल्हा निर्माण कृती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून अटक व सुटका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी – गेल्या वर्षभरापासून सातत्याने ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीला घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ब्रह्मपुरी तालुका जिल्हा निर्माण कृती संघर्ष समितीच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आली. तरी मात्र शासन सदर मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. समितीच्या वतीने मागील आठवड्याभरापासून साखळी उपोषण सुद्धा सुरू आहे. हा लढा तीव्र करण्यासाठी दिनांक 24 जुलै 2024 रोजी बुधवारला प्रियदर्शनी इंदिरा गांधी व ख्रिस्तानंद चौकासह ब्रह्मपुरी शहरातील विविध चौकात तब्बल दोन तास समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा बाजी करीत चक्काजाम आंदोलन केले. यावेळी ब्रह्मपुरी शहर कडकडीत बंद पाळला व्यापारी प्रतिष्ठाने सुद्धा यावेळी बंद होते.याप्रसंगी ब्रह्मापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांना ब्रह्मपुरी जिल्हा मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले असून त्यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवणार येणार आहे.यावेळी भर रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. आणखीच परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेऊन अटक केली व त्यानंतर आंदोलकाची सुटका करण्यात आली.

ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी येत्या काही दिवसात शासनाने पूर्ण न केल्यास 15 ऑगस्टला आत्मदहन करू असा थेट इशारा शासनाला ब्रह्मपुरी जिल्हा कृती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये विनोद झोडगे,प्रशांत डांगे,अविनाश राऊत,सूरज शेंडे, प्रा.देविदास जगनाडे सर, हरीचंद्र छोले सर,राजू भागवत,मिलिंद भनारे,मंगेश फटीग,सुयोग बाळबुधे,अमित रोकडे,कोकोडे सर,इकबाल कुरेशी,लीलाधर वंजारी,दीपक नवघडे, ड्रॉ. प्रेमलाल मेश्राम,भाऊराव भजगवळी, रक्षित रामटेके, जीवन बागडे, शब्बीर अली , फारूक बकाली, दत्तू टिकले, दत्ता येरावार आंदोलनात सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये