संताजी भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
शहरातील संत श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने आज अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विधिवत साजरी करण्यात आली. गुरुवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता संताजी भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला हार पुष्पगुच्छ अर्पण करून जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी संत श्री संताजी सेवा मंडळाचे अध्यक्ष मंगेश बेले, उपाध्यक्ष सुधाकर घुबडे, सचिव राजेश खनके, कोषाध्यक्ष मोहन कळंबे, सहसचिव अनिल ढोक, कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर कांबळी, मधु शेंडे, लोहबळे काकाजी यांच्यासह युवक मंडळाचे पलाश कवलकर, निखिल घुबडे, अविकांत नरड, दिनु शेंडे,महिला आणि युवती मंडळाच्या सौ.स्मिता कवलकर, पूजा लोहबळे, समृध्दी शेंडे, प्रा.सौ. संध्या हजारे यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती. आयोजित कार्यक्रमाला नगर सेवक मनोज बेले आणि नगर सेवक प्रणित सातपुते यांची विशेष उपस्थिती लाभली.



