तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी नुकसान भरपाई द्या :- आप युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक
आप व कि. यु. शे. संघटने तर्फे तहसीलदार यांना दिले निवेदन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भाग हा जलमय झाला आहे. नदी, नाल्यांना पुराचा स्वरूप घेतला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पेरणी करून नामांकित कंपनीचे बियाणे बोगस ठरले असून वापिला आले नाहीत.
शेतकऱ्यांवर आधीच दुबार पेरणीचे संकट आले असून यात अनेक शेतकऱ्यांना कर्जबाजारी होऊन पेरणी करावी लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. ज्यात सोयाबीन, तूर, कापूस, धान यासारख्या पिकांची मातीसह रोपटे वाहून गेले आहे. ज्या प्रमाणे दिल्ली व पंजाब मधे आम आदमी पार्टी ची सरकार 50 हजार रुपये हेक्टरी प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येते.
त्याच प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा देण्यात यावी व तत्काळ भद्रावती तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा. तसेच प्रत्येकी 50 हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी चे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी तहसीलदार यांना निवेदना द्वारे केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, रोहन गाज्जेवार, शेतकरी नेते सुरज खंगार, शेतकरी नेते रवींद्र गेजिक, पवन ढोके, रोशन मानकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



