ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे लाभ द्या-संदीप गड्डमवार यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

सावली तालुका हा धानपट्ट्याचा भाग असून सावली तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक विमा उतरविला आहे.

शासनाने एक रुपयात पीक विमा काढून शेतकऱ्यांना एक चांगली सोय उपलब्ध करून दिली मात्र त्याच पीक विम्याचा लाभ हा शेतकऱ्यांना देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे.

त्यामुळे यावर्षी काही शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळाला मात्र अनेक शेतकरी या पीक विम्यापासून वंचित आहे त्यामुळे सावली तालुक्यातील अलिप्त असलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे सरसकट लाभ द्यावे अशी मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संदीप गड्डमवार यांनी केलेली आहे.या संदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना पत्र पाठवून मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये