ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुर्झा वार्ड देवस्थान तलाव फुटण्याचा धोका

अनेक शेतकऱ्यांचे होईल नुकसान ; माती पोखरुन पार केली कमकुवत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

       ब्रह्मपुरी परिसरातील कुर्झा वार्ड येथील सार्वजनिक हनुमान देवस्थान व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान जवळील तलाव सततच्या पावसामुळे तुडुंब भरला आहे .या तलावाच्या पाळीची माती काही शेतक-यांनी काढून प्लाटीक थैल्यात भरुन आपल्या सोयीचा मार्ग केला, त्यामुळे तलावाची पाळ दोन ठिकाणी कमकुवत झालेली आहे. वार्डातील पंढरी सेलोकर ,किशोर बावनकुळे, डॉ धनराज खानोरकर, गोकुळ सहारे,किशोर त-हेकर यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर पाळीवरील माती घसरुन  तलावाची पार तलावातील पाणी जास्त झाल्यानंतर फुटण्याचा धोका संभवत असल्याचे त्यांच्या दर्शनास आले.
    सध्या पावसाचा जोमदार मोसम असल्यामुळे पार फुटली तर तलावाजवळील शेत जलमय होऊन शेतक-यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून आताच तातडीने निर्णय घेऊन पार मातीने भरणे आवश्यक असल्याचे बोलल्या जाते.ज्यांनी या पारीला इजा केली त्याच्यावर कारवाई केली जाईल,असे देवस्थान कमेटीचे म्हणणे असून ज्या ज्या शेतक-यांनी माती पोखरली त्यांनी त्यांनी पारीवर माती टाकून पार पक्की करावी, अन्यथा सार्वजनिक देवस्थान कमेटी कारवाई करेल,असे सांगण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये