Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खिशातून पडलेले पर्स प्रामाणिकपणे केले सुपूर्द

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस ठाणे वर्धा (श) येथे दिनांक १६/०७/२०२४ रोजी अर्जदार श्री आतिष प्रल्हाद सहारे वय २९ वर्ष, रा.नालवाडी, वर्धा यांनी येवून तक्रार दिली की, त्यांचे खिशातील पर्स वर्धा शहरामध्ये कुठेतरी पडली व हरवली आहे. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ऑफीस आयकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना व रोख १२० रू असल्याबाबते लेखी तक्रार दिली होती. सदर पर्स ही अग्रगामी हायस्कूल, मसाळा येथे ५ व्या वर्गामध्ये शिकणारी विद्यार्थीनी कु.त्रिशला अमोल भगत वय १० वर्ष, रा.जिजाउनगर, धुनीवाले मठ चौक, वर्धा हिला वैचलर रोडवरून आई सौ. शिल्पा भगत व वडील अमोल भगत यांचेसह जात असतांना रस्त्यावर पडलेले मिळून आले.

त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ऑफीस आयकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना व रोख १२० रू होते. सदर पर्स आज दिनांक १६/०७/२०२४ रोजी कु. त्रिशला अमोल भगत हिने आईसह पोलीस ठाण्यात येवून परत केले. सदर पर्स ही आतिष सहारे यांना बोलावून परत करण्यात आले. त्यावेळी वर्धा श. पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री. पराग पोटे यांचेसह इतर अधिकारी व अंमलदार यांनी पुष्पगुच्छ देवुन तिचे अभिनंदन करून तिने दाखविलेल्या प्रामणिकपणाचे कौतुक केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये