ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वन्यप्राण्यांचा हल्ला टाळण्यासाठी सायमारा येथे वन विभागामार्फत ब्रँडेड नेटची सुविधा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

पाथरी:- सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र पेंढरी, नियतक्षेत्र मुंडाळा मधील मौजा सायमारा येथे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीचे बाजूला वनविभागाकडून ब्रॅण्डेड नेट लावण्यात आले सायमारा हा गाव जंगलाने व्याप्त असलेला गाव असून जील्हा परिषद शाळा तसेच आंगणवाडीचा बाहेरचा परिसरात झुडपात वन्यप्राणी बिबट राहत असल्याचे मागील आठवड्यापासून गावकऱ्यांचे निदर्शनास येत होते.

याबाबतची माहिती वनरक्षक महेश अहिरकर यांना देण्यात आली. अंगणवाडी जवळ असल्याने लहान मुलांवरती कधीही हल्ला होण्याची शक्यता असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करीता पुर्व नियोजन म्हणून श्री विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक पेंढरी श्री ए एन मेश्राम व श्री महेश अहिरकर वनरक्षक मुंडाळा यांनी वन्यप्राणी बिबट व वाघापासून होणारे हल्ले थांबविण्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने ब्रॅण्डेड नेट लावून दिले.

त्यामुळे गावकऱ्यांकडून वनविभागाप्रती कृतघ्नता व्यक्त केली असुन गावकऱ्यांचे चेहऱ्यावर आनंद फुलू लागले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये