ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाहनांवरील विलंबन शुल्क रद्द करा

जिल्हा ऑटो संघटनेचे खा. प्रतिभा धानोरकर यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         राज्य परिवहन विभागातर्फे 15 वर्षांच्या आतील वाहनांवरील प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क प्रति दिवस पन्नास रुपये एवढा दंड लादण्यात येत आहे.त्यामुळे लहान शहर तसा ग्रामीण भागातील वाहन चालकांना अवास्तव भुर्दंड सोसावा लागणार असून हा ॲटो व्यवसायिकांवर अन्याय आहे. त्यामुळे लादण्यात आलेले हे अवास्तव विलंबन शुल्क रद्द करण्यात यावे यासाठी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण ऑटो रिक्षा संघटनेतर्फे खासदार प्रतिभा धानोरकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. लहान शहर तथा ग्रामीण भागातील ऑटो व्यवसाय अतिशय लहान स्वरूपाचा असल्यामुळे आधीच ऑटो व्यवसायिक कसेबसे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.

ज्या ऑटो व्यवसायिकांची वाहने तीन ते चार वर्षांपासून पासिंग नाही त्यांना या प्रति दिवस विलंबन शुल्कामुळे जवळपास 50 ते 60 हजाराचा भुर्दंड पडणार आहे. एवढा मोठा दंड भरणे ऑटो व्यवसायिकांना शक्य नाही, त्यामुळे ऑटो व्यवसायिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून हे प्रति दिवस 50 रुपये असलेले विलंबन शुल्क रद्द करण्याची मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना ऑटो संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये