Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कायद्यानुसार बिल देण्याची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर मध्ये नंदिनी चुनारकर यांची मागणी 

चांदा ब्लास्ट

अनेक दुकानदार वस्तू खरेदी केल्यानंतर कायद्यानुसार ग्राहकांना योग्य बिल देत नाही.त्यामूळे ग्राहकांची फसवणूकीची दाट शक्यता असते.याबाबतची लेखी तक्रार प्राप्त झाल्याने प्रत्येक दुकानदाराने कायद्यानुसार योग्य ते बिल देणे संबंधाने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चे अशासकीय सदस्य तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नंदिनी चुनारकर यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर च्या मासिक सभेत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूरचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे केली. ही मासिक सभा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे दिनांक २५ जून २०२४ रोजी पार पडली.या मासिक सभेला जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर सदस्य -सचिव अजय चरडे यांच्यासह विविध शासकीय सदस्य व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

अनेक सेतू सेवा केंद्रावर शुल्क फलक नसल्याने त्याचप्रमाणे घेतलेल्या शुल्काप्रमाणे पावती मिळत नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असून शासकीय शुल्क घेऊन शुल्काप्रमाणे पावती देणे संदर्भात मागणी केली आहे.

हर घर जल मिशन अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नळाला जलमापक लावलेल्या प्रत्येक ग्राहकाला नळाद्वारे पाणीपुरवठा दररोज करण्याची मागणी या सभेत नंदिनी चुनारकर यांनी केली.

विविध सण, जयंती, पुण्यतिथी इत्यादी कारणांमुळे चंद्रपूर शहरातील मुख्य रस्ता बंद असतो.अशावेळेस वाहतूक व्यवस्था कोलमडून पडते. वाहतूक व्यवस्था सुधारणा संबंधाने सभेत विषय मांडण्यात आला.

याशिवाय जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर च्या मासिक सभेत विविध अशासकीय सदस्यांनी विषय मांडून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे लक्ष वेधले.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद ही ग्राहक कायद्यान्वये स्थापन झाली असल्याने ग्राहकांनी आपल्या विविध समस्या, प्रश्न, मागण्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे द्यावे.असे आवाहन ग्राहक पंचायत चे पदाधिकारी यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये