ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूरात भव्य महाआरोग्य शिबीर संपन्न

२४७३ रुग्णांनी केली विविध आजारांची निःशुल्क तपासणी, तर ४४२ रुग्ण शस्त्रक्रियेस पात्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरड कर

मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय गडचांदूर तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी(मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. ३०) गडचांदूर येथील स्व. भाऊराव पा. चटप आश्रमशाळेत भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन स्थानिक भाजपाचे जेष्ठ नेते महेश शर्मा, महादेव एकरे, शिवाजी सेलोकर, महादेव जयस्वाल, रमेश काकडे आणि विश्वंभर झाम यांच्या हस्ते संपन्न झाले.

नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दिवसभर चाललेल्या या शिबीराचा गडचांदूर शहर परिसरातील २४७३ नागरीकांनी लाभ घेतला.

सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या शिबीरात मेडिसीन, नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रिरोग, कान-नाक-घसा, अस्तिरोग, त्वचारोग आणि कॅन्सर यांसारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. यामध्ये तपासणी झालेल्या २४७३ रुग्णांपैकी ४४२ रूग्ण हे शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरले. त्यांचेवर उद्यापासून टप्प्या-टप्प्याने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे शस्त्रक्रिया पार पडणार आहेत.

या शिबिरामध्ये आयोजक म्हणून बोलताना आयोजक तथा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे म्हणाले की, लोकनेते, विकासपुरुष ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आम्हाला सेवेचा मंत्र दिला आहे. खरंतर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नावाचं समानार्थी शब्दच सेवा असा होतो आणि त्यांच्या सेवेचा वसा पुढे नेत मागील अनेक वर्षांपासून आम्ही जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा पद्धतीच्या महाआरोग्य शिबीरांचे आयोजन करतो. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची शिकवण आहे, की विजय झाला तर माजायचं नाही आणि पराभव झालं तर लाजायचं नाही.’ त्यामुळे गोरगरीबांच्या हाकेला ओ देण्यासारखे दुसरे पुण्य नाही, ही भावना जोपासून आम्ही लोकसेवेचा हा यज्ञ चालू केला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात ग्रामीण भागातील गोरगरिब बांधव आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात; अनेकदा पैशाअभावी अतीगंभीर आजार अंगावर काढतात त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात.

अशावेळी गडचांदूर शहर व परिसरात राहणाऱ्या गोरगरिब बांधवांना पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत भेडसावणाऱ्या समस्यांचे एकाच छताखाली निदान, उपचार व शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून अशाप्रकारच्या महाआरोग्य शिबीराचे आज आयोजन करण्याचे आले आहे. या शिबिराचा २४७३ नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. अनेक गरजू माताभगिनींना यामुळे आजारांचे निदान व उपचार मिळविता आले याचे मला आत्मीय समाधान वाटते.

पुढे बोलताना, येत्या ३० जुलै रोजी राजुरा शहरात सुद्धा अशाप्रकारच्या भव्य महाआरोग्य शिबीरांचे आयोजन होणार असून नागरिकांनी त्या ठिकाणीही अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करीत शिबीराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे यावेळी मी आभार ही मानले.

या शिबिरात आश्रमशाळेचे संचालक प्रशांत चटप, तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार, विजयलक्ष्मी डोहे, अरुण मडावी, अरविंद डोहे, रामसेवक मोरे, संजय मुसळे, निलेश ताजने, रोहन काकडे, राकेश अरोरा, शंकर आपुरकर, संदीप शेरकी, हितेश चव्हाण, आशिष ताजने, महेश घरोटे, नूतनकुमार जीवने, गोपाल मालपाणी, पुरुषोत्तम भोंगळे, विशाल गज्जलवार, सुनील उरकुडे, सुरेश रागीट, वामण तुराणकर, अनंता येरणे, संजय उपगण्लावार, विनोद नरेन्दुलवार, सचिन भोयर, अरविंद कोरे, अशोक झाडे, शेख मेहताब, धर्मराज वाघमारे, अजीम बेग, निखील भोंगळे, जगदीश पिंपळकर, प्रमोद पायघन, तिरुपती किन्नाके, विशाल अहिरकर, सागर धुर्वे, योगेंद्र केवट, विलास केवट, सतिश आत्राम, रमेश चुदरी, रंजना मडावी, शितल धोटे, अपर्णा उपलेंचवार, सपना सेलोकर, नम्रता विश्वास, दुर्गा पेंदोर, माया बावनकुडे, तृप्ती गुंडावार, विनाताई मुद्दलवार, त्रिवेना जगताप, सपना भोंगळे, पल्लवी अवताडे, सुनंदा डोहे, अर्चना आंबेकर, विनोद गोंडे, रवी बंडीवार, भाऊराव तुराणकर, भगवान चव्हाण, गजानन गोंडे, विनोद बेटूलवार, धम्मकीर्ती कापसे, प्रमोद शेंडे, परशुराम मुसळे, आशिष ढूमणे, मंगेश तिखट, प्रफुल पाल, जगन कपासे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये