ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवशक्ती आयुर्वेदीक दवाखानाविरुद्ध मनपाची पोलीसात तक्रार

चांदा ब्लास्ट

शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या नवशक्ती आयुर्वेदीक दवाखानाविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. १ कार्यालयाद्वारे शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     शहरातील जटपुरा गेट तसेच छोटा बाजार चौक रोड परिसरातील भिंतींवर,विविध शासकीय व खाजगी परिसरात नवशक्ती आयुर्वेदीक दवाखान्याची  जाहिरात करणारे स्टीकर्स,भिंतीपत्रके मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावले असल्याचे सहायक आयुक्त यांना २६ जुन रोजी पाहणीदरम्यान आढळुन आले.

    संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने नवशक्ती आयुर्वेदीक दवाखाना यांच्यावर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा अश्या आशयाची तक्रार करण्यात आली आहे. जाहिरात करण्यास अश्या प्रकारचा अवलंब केल्याने शासकीय निधीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तसेच शहर सुशोभीकरणाच्या कामातही बाधा निर्माण होते.

     भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरण होते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये