ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंमली पदार्थाचे (ड्रग्ज) सेवन तसेच वाढत्या नशाखोरीवर प्रभावीपणे नियंत्रण आणा.

जागतिक ड्रग डे च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांना काँग्रेस नेते महेश मेंढे यांचे निवेदन.

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्हा तसेच चंद्रपूर महानगरातील वाढत्या अंमली पदार्थ तस्करीला, प्रभावी उपाययोजनांच्या माध्यमातून अंकुश घालण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी जागतिक ड्रग डे च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांना काँग्रेस नेते महेश मेंढे यांचे निवेदनाच्या माध्यमातून केली.

जिल्हयात तसेच चंद्रपूर महानगरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अंमली पदार्थाच्या तस्करीकडे तद्वतच या अंमली पदार्थाच्या अवैध खरेदी आणि विकीच्या प्रकाराकडे आणि अल्पवयीन मुलांपासून तर शाळकरी महाविद्यालयीन युवकांपर्यंत या पदार्थाचे सेवन करण्याची प्रवृत्ती वाढल्याच्या गंभीर प्रकाराकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण दारूबंदी लागू झाल्यानंतर पोलीस विभागाने अवैध दारूच्या खरेदीविकीला प्रतिबंध घालण्यासार्टी अनेक उपाययोजना अंमलात आणलेल्या होत्या. जिल्ह्यातील अनेक शहरी भागात गांजा, अफू, चरस एम. डी यासारखे अंमली पदार्थाच्या तस्करीला मोठ्या प्रमाणात ऊत आलेला आहे. पोलीसांनी अनेक ठिकाणी धाडी घालून अंमली पदार्थ जप्त केला असला तरी अजुनही राजरोसपणे अंमली पदार्थाची विकी मोठ्या प्रमाणात होत असून हा प्रश्न चिंतेचा बनलेला आहे. या प्रश्नी गांभीर्य याचे वाटते की, या तस्करांच्या जाळ्यात युवावर्ग मोठ्या प्रमाणात अडकुन अंमली पदार्थाचे सेवन करीत आहे. परिस्थिती हाताबाहेर जावू लागली असल्याने पोलीस विभागाने या प्रश्नाला अत्यंत गांभीर्याने घ्यावे गेल्या दीड-दोन वर्षांपासून अंमली पदार्थमुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. महिला व मुलींची छेड काढण्याचे प्रकार सर्वोसपणे होत आहे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या भीतीमुळे या घटनांची तकार करण्याचे धाडस संबंधित मुलींचे पालक करीत नसल्याने हा प्रकार वाढलेला आहे.

आपण चंद्रपूर जिल्हा तसेच चंद्रपूर महानगरातील वाढत्या अंमली पदार्थ तस्करीला, प्रभावी उपाययोजनांच्या माध्यमातून अंकुश घालण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती आहे.

आपण या प्रश्नी योग्य सहकार्य करावे. आपल्या या समाजाभिमुख व राष्ट्राभिमुख कार्याला काँग्रेस पक्षाचा माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.अशाप्रकारे निवेदनाच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षकांना अमली पदार्थाच्या उच्चाटनासाठी विनंती करण्यात आली. यावेळेस अश्विनी ताई खोब्रागडे, मोहम्मद इरफान शेख, मोहम्मद कादर शेख, प्रकाश देशभ्रतार, रोशन रामटेके , मेश्राम आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये