ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बॅन केलेल्या कोल डेपोंना सील करा

काँग्रेस नेते विजय नळे यांची फौजदारी कार्यवाहीची मागणी ; जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले योग्य कार्यवाहीचे निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           शहराच्या घुगुस मार्गावरील कित्येक कोल डेपो अजूनही सर्रास सुरू आहेत. या कोड डेपोमध्ये चोरी आणि हेराफेरी केलेला कोळशाची आवक-जावक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कॉल डेपो पैकी 24 कॉल डेपो अवैध असल्याचा निर्वळा दिला होता मात्र सारे कोल डेपो बिन बोभाट सुरू असल्याची माहिती देत काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय नळे यांनी या सगळ्या बॅन केलेल्या कोल डेपोला तात्काळ सील ठोकण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 15 व उप कलम 2 अन्वये फौजदारी कार्यवाहीचा आग्रह सुध्दा या निवेदनातून करण्यात आला आहे.या संदर्भात बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी विनायक गौडा जीसी यांनी तात्काळ दाखल घेऊन निवेदनावर लगेच शेरा देत पुढील कार्यवाहीसाठी संबंधितांना निर्देश दिले आहेत.

 जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय नळे यांनी म्हटले आहे की चंद्रपूर शहरात आधीच विविध प्रकारचे प्रदूषण आहे आणि त्यामुळे जनता मेटाकुटीस आली आहे. दरम्यान घुगुस मार्गावर अनेक पोल डेपो विनापरवानगी सुरू आहेत. यामुळे धूळ प्रदूषण, शेतीचे प्रदूषण, वायू प्रदूषण, ओवर लोडिंग, अपघाताचा धोका, कोळसा चोरी आणि हेराफेरी साठी गुन्हेगारीस प्रोत्साहन अशा अनेक समस्या उत्पन्न झाल्या आहेत. या समस्या गंभीर सामाजिक समस्या असल्यामुळे त्याचे तात्काळ निवारण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 12 जून 2019 रोजी श्री. वसावे यांचे मार्गदर्शनात 24 कोल डेपो अवैध ठरवले होतें. 17 फेब्रुवारी 2020 रोजी नियमबाह्य कोळशाच्या वाहतूक व हेराफेरी प्रकरणी नागाळा येथे 26 ट्रक पकडले होते. ही कारवाई लोकल क्राईम ब्रांचं ने केली होती. 19 मार्च 2021 रोजी फिल्ड ऑफिसर सुर्यवंशी यांनी बंद करण्याचे आदेश दिलेल्या कोल डेपो चा आढावा घेतला आणि ते सर्वच सुरु असल्याचे सांगितले होते.मात्र वरिष्ठ स्तरावरून या संबंधात ठोस कार्यवाही न झाल्याने अजूनही कोल डेपो चा गोरख धंदा सुरू आहे.

काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय नळे यांनी स्वतः या परिसराचा दौरा करून सुरू असलेल्या कोल डेपो चे छायाचित्र तसेच चित्रफीत बनवून जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर गंभीर झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश आपल्या यंत्रणेला दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विजय नळे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण तसेच आकडेवारी सहित दिलेल्या निवेदनात या समस्येची तीव्रता प्रशासना समोर ठेवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरून याप्रकरणी नेमकी कोणती कार्यवाही होते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये