Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुरघास पद्धतीने जनावरांच्या प्रकृती विषयक मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    सालोरी ग्रामीण कार्यानुभव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथील कृषी कन्यांनी तालुक्यातील सालोरी या गावामध्ये मुरघास प्रक्रियेविषयी अनेक शेतकर्यांना मार्गदर्शन केले.

   दुष्काळी भागात तसेच उन्हाळ्यात जनावरांना सकस व पुरेसा हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम व त्यांच्यी खालावली जाणारी दूध पातळी यावरील उत्तम पर्याय म्हणजे मुरघास पद्धती आहे. यामध्ये वापरली जाणारी पिके, पिकांची कापणी, आवश्यक साहित्य, मुरघास साठवण्याची व तयार करण्याची प्रक्रिया तसेच जनावरांना तो किती प्रमाणात द्यावा आणि त्यामुळे होणारे फायदे याविषयी शेतकऱ्यांना कृषी कन्या विद्यार्थीनींनी मार्गदर्शन केले.

  यावेळी आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस. पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर.वी. महाजन, कार्यक्रम समन्वयक आर.वी.तायडे आणि विषय विशेषज्ञ डॉ.एस. गाजर्लेवार यांचे देखिल मार्गदर्शन लाभले. शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी आयोजित या कार्यक्रमामध्ये सालोरी येथे कृषी कन्या वैष्णवी कोरडे, तनया महल्ले,मिताली झाडे,पुनम लुचे,मिनल खिरटकर,रूचिता कुंभारे, निकीता लाहोरे यांचा समावेश होता. याबरोबरच इतर ग्रामस्थ व शेतकरी यांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये